Share Market: Sensex 650 अंकानी घसरला, गुतंवणूकदारांचे कोट्यवधींचे नुकसान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Todays Share Market Updates

Share Market: Sensex 650 अंकानी घसरला, गुतंवणूकदारांचे कोट्यवधींचे नुकसान

आठवड्याभरापासून शेअर बाजारात अस्थिरता होती. आजही सुरवातीच्या सत्रात शेअर बाजारात अस्थिरता कायम होती. दिवसभराच्या अस्थिरतेनंतर आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शेअर बाजार घसरणीसह बंद झाला.

सेन्सेक्स 651 अंकाच्या घसरणीसह 59,650 वर बंद झाला तर निफ्टी 200 अंकाच्या घसरणीसह 17,760 वर बंद झाला. आज शेअर बाजारात फक्त 6 शेअर्समध्ये वाढ झाली तर तब्बल 44 शेअर्स खाली आले. TCS,BAJAJ-AUTO,ADANIPORTS सारखे शेअर्स तेजीत आहे. (share market closing update 19 august 2022)

हेही वाचा: Share Marketमध्ये अस्थिरता, मात्र आयटी शेअर्समध्ये तेजी

आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सुरवातीच्या सत्रात शेअर बाजार हलक्या तेजी सह सुरू झाला होता. सेन्सेक्स 52 अंकाच्या तेजीसह 60,350 वर सुरू झाला तर निफ्टी 16 अंकाच्या तेजीसह 17,973 वर सुरू झाला. याशिवाय पहिल्या सत्रात आज शेअर बाजारात 32 शेअर्समध्ये तेजी दिसून आली होती.

हेही वाचा: Share Market: आज शेअर बाजारात तेजी, Nifty 17,944 वर तर Sensex 418 अंकांनी वधारला

शेअर बाजारात गुरुवारी अस्थिरतेचे वातावरण दिसून आले. सकाळी बाजार लाल चिन्हात उघडला पण नंतर हिरव्या चिन्हावर बंद झाला होता. सेन्सेक्स सुमारे 66.61 अंक अर्थात 0.11% च्या वाढीसह 60,326.74 वर बंद झाला होता, तर निफ्टी केवळ 20.95 अंकांच्या अर्थात 0.12% च्या वाढीसह 17,965.20 वर बंद झाला होता.

Web Title: Share Market Closing Update 19 August 2022

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..