Share Market: शेअर बाजारात पडझडीचं सुरूच, सकाळच्या तेजीनंतर पुन्हा घसरण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Share Market: शेअर बाजारात पडझडीचं सुरूच, सकाळच्या तेजीनंतर पुन्हा घसरण

Share Market: शेअर बाजारात पडझडीचं सुरूच, सकाळच्या तेजीनंतर पुन्हा घसरण

आज दिवसभरात शेअर बाजारात पुन्हा घरसण झाली आहे. गेल्या दोन दिवसात मोठी घसरण झाल्यानंतर आज शेअर बाजारात स्थिरता दिसून येत होती. राष्ट्रीय शेअर बाजार निर्देशांक सेन्सेक्समध्ये 37 अंकांची घसरण पाहायला मिळाली, तर निफ्टीमध्ये 9 अंकांची घसरण झाली. सेन्सेक्समध्ये आज 0.07 टक्क्यांची घसरण होऊन तो 57,107 अंकांवर स्थिरावला तर निफ्टीमध्ये 0.05 टक्क्यांची घसरण होऊन तो 17,007 अंकांवर स्थिरावला आहे.

मागील आठवड्यापासून शेअर बाजारात मोठी घसरण झाली होती. काल दिवसभरात शेअर बाजारात 900 अंकांची घसरण झाली होती. आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी शेअर बाजार सावरताना दिसत आहे. बाजाराची सुरवात होताच सेन्सेक्समध्ये 278 अंकांची तेजी दिसून आली तर, निफ्टीत 60 अंकाच्या तेजीसह व्यवहार करत होता. तर सेन्सेक्समध्ये आज 0.18 टक्क्यांची तेजी होऊन तो 57,248 अंकांवर सुरू झाला तर निफ्टीमध्ये 0.22 टक्क्यांची तेजी होऊन तो 17,053 अंकांवर सुरू झाली होती.