Share Market: शेअर बाजारात मोठी उसळण; Sensex 1,564 वर तर Nifty 446 | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sensex 50 points in growth; Nifty 8400 level again

Share Market: शेअर बाजारात मोठी उसळण; Sensex 1,564 वर तर Nifty 446

शेअर बाजारातील कालच्या घसरणीनंतर आजचा दिवस गुंतवणूकदारांसाठी सोन्याचा ठरला असल्याचं दिसून आलं आहे. काल शेअर बाजारात तेजीला मोठा ब्रेक लागला होता. परंतु आज शेअर बाजारात सुरवतीपासून तेजी पाहायला मिळाली आहे. आज सकाळच्या सत्रात भारतीय शेअर बाजारातील व्यवहाराची सुरुवात तेजीने झाली होती. बाजार सुरू होताच सेन्सेक्स 486 अंकांनी तर, निफ्टी 171 अंकांनी तेजीत व्यवहार करत होती. पण, आज दुपारच्या सत्रात शेअर बाजारात मोठी तेजी पाहायला मिळाली.

शेअर बाजारात आज चांगलीच उसळण दिसून आली आहे. आज राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये 1564 अंकांची तर निफ्टीमध्ये 446 अंकांची वाढ झाली. सेन्सेक्समध्ये आज 2.70 टक्क्यांची वाढ होऊन तो 59,537 अंकांवर वधारला तर निफ्टीमध्ये 2.58 टक्क्यांची वाढ होऊन तो 17,759 अंकांवर वधारला आहे.

आज शेअर बाजारात फायनान्शिअल आणि ऑटो सेक्टरच्या इंडेक्समध्ये मोठी वाढ झाली आहे. तर HDFC, ICICI बँक आणि टाटा मोटर्सच्या शेअर्समध्ये चांगलीच वाढ दिसून आली आहे. निफ्टीमधील सर्वच 50 स्टॉकमध्ये आज वाढ झाली आहे.

Web Title: Share Market Closing Update 30 August 2022

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..