Share Market: शेअर बाजारात दिवसभरात तेजी; सेन्सेक्स 156 तर निफ्टी 57 अंकांवर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Share Market Updates

Share Market: शेअर बाजारात दिवसभरात तेजी; सेन्सेक्स 156 तर निफ्टी 57 अंकांवर

आज दिवसभरात शेअर बाजारात चांगलीच तेजी दिसून आली आहे. आज सकाळच्या सत्रात शेअर बाजार तेजीत दिसून आला आहे. शेअर बाजारात आज प्री-ओपनिंग सत्रात खरेदीचे संकेत दिसून आले. शेअर बाजारात आजही सकारात्मक सुरुवात झाली. आज सेन्सेक्स 156 अंकाच्या तेजीसह 58,222 वर बंद झाला तर निफ्टी 57 अंकाच्या तेजीसह 17,331 वर बंद झाला आहे.

सकाळच्या सत्रात सेन्सेक्स 430 अंशांची उसळी झाली होती, निफ्टीमध्येही 126 अंशांची वाढ झाली होती. सकाळच्या सत्रात बाजारातील व्यवहाराला आज सुरुवात झाल्यानंतर बाजारात सेन्सेक्समध्ये 400 हून अधिक अंकांची तेजी दिसून आली होती. आज सेन्सेक्स 58,525 वर सुरू झाला तर निफ्टी 17,409 वर सुरू झाली होती.