
Share Market: शेअर बाजारात घसरणीचे सत्र सुरुच; सेन्सेक्स 388.20 तर निफ्टी 144.65 अंकांनी घसरला
Share Market closing Updates: गेल्या तीन दिवसांपासून शेअर बाजारात सुरु असलेले घसरणीचे सत्र आजही सुरु राहिले. आज सकाळी शेअर बाजाराच्या दोन्ही निर्देशांकात घसरण झाली. आज दिवसअखेर सेन्सेक्स (Sensex) 388.20 अंकांनी अर्थात 0.66 टक्क्यांनी घसरून 58576.31वर बंद झाला. निफ्टी (Nifty) 144.65 अंकांनी अर्थात 0.82 टक्क्यांनी घसरून 17,530.30 वर बंद झाला.
हेही वाचा: हे '3' शेअर्स देतील तुम्हाला तगडा परतावा, कोणते आहेत हे शेअर्स जाणून घेऊयात
तत्पूर्वी काल सेन्सेक्स-निफ्टी सोमवारी घसरणीसह बंद झाले. आयटी शेअर्सने बाजारावर सर्वाधिक दबाव निर्माण केला. ऑइल-गॅस, पॉवर आणि रिअॅल्टी शेअर्समधील खरेदीमुळे शेअर्स बाजाराला काही अंशी साथ मिळाली. सेन्सेक्स 482.61 अंकांनी म्हणजेच 0.81 टक्क्यांनी घसरून 58,964.57 वर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टी 109.40 अंकांनी म्हणजेच 0.62 टक्क्यांनी घसरून 17,674.95 वर बंद झाला.
Web Title: Share Market Closing Updates Sensex Nifty News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..