
शुक्रवारी शेवटच्या तासात शेअर बाजारात मोठी घसरण दिसून आली.
तेजीनंतर शुक्रवारी शेअर बाजारात पुन्हा घसरण!
शुक्रवारी शेवटच्या तासात शेअर बाजारात (Share Market) मोठी घसरण दिसून आली. बँकिंग, कॅपिटल गुड्स शेअर्समध्ये नफावसुली अर्थात प्रॉफिट बुकिंग झाल्याने ही पडझड झाली. दुसरीकडे मिडकॅप (Midcap) आणि स्मॉलकॅप शेअर्समध्ये (Smallcap shares) खरेदी कायम राहिली. फार्मा, ऑइल-गॅस, रियल्टी, आयटी शेअर्समध्ये खरेदी झाली. निफ्टी वरच्या स्तरावरून 270 तर सेन्सेक्स (Sensex) 870 अंकांनी खाली आला. निफ्टी (Nifty) बँकही वरच्या स्तरावरून 680 अंकांनी घसरला. निफ्टीत 50 पैकी 30 शेअर्सची खरेदी झाली. त्याचवेळी सेन्सेक्समधील 30 पैकी 17 शेअर्स वधारले. निफ्टी बँकेचे 12 पैकी 8 शेअर्स घसरले.
हेही वाचा: उसळी घेतलेलं शेअर मार्केट पुन्हा झालं 'रेड'
निफ्टीने लाँग अपर शॅडोसह डेली स्केलवर बियरिश कँडल तयार केल्याचे मोतीलाल ओसवालचे चंदन तापडिया म्हणाले. निफ्टीने त्याच्या शेवटच्या 6 ट्रेडिंग सत्रांची लोअर हाय फॉर्मेशन नाकारले आणि डेली आणि विकली स्केलवर गेल्या 2 आठवड्यांपासून लोअर हाय आणि लोअर लोजसह बियरिश कँडल तयार केली. आता पुढील टप्प्यासाठी निफ्टीला 17000 च्या वर रहावे लागेल. असे झाल्यास निफ्टीमध्ये 17,350 आणि 17,500 ची पातळी पुन्हा दिसू शकते. खाली, निफ्टीला 16,850 वर सपोर्ट दिसत असल्याचे ते म्हणाले.
बाँड यिल्ड, कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती आणि व्याजदरात वाढ होण्याची शक्यता यामुळे जागतिक बाजारात घसरण होत असल्याचे कोटक सिक्युरिटीजचे श्रीकांत चौहान म्हणाले. त्याचाच परिणाम भारतीय बाजारांवरही दिसून येत आहे.
हेही वाचा: शेअर बाजार गडगडला... सेन्सेक्समध्ये 1000 अंकांची घसरण
आता सर्वांच्या नजरा पुढील आठवड्यात 1 फेब्रुवारीला येणाऱ्या बजेटकडे लागल्याचे रेलिगेअर ब्रोकिंगचे अजित मिश्रा म्हणाले. या अर्थसंकल्पात सरकार विकासावर तसेच फिजिकल कंसोलिडेशनवर भर देईल, अशी आशा असल्याचे ते म्हणाले. याशिवाय कंपन्यांचे निकाल आणि जागतिक बाजारातील संकेतांवरही बाजाराची नजर असेल. त्यामुळेच गुंतवणुकीचे निर्णय सावधगिरीने घेण्याचा सल्ला मिश्रा यांनी दिला.
आजचे टॉप 10 शेअर्स?
- एनटीपीसी लिमिटेड (NTPC)
- यूनायटेड फॉस्फरस लिमिटेड (UPL)
- सन फार्मा (SUNPHARMA)
- टाटा काँझ्युमर्स (TATACONSUM)
- इंडसइंड बँक(INDUSINDBK)
- एलआयसी हाउसिंग फायनान्स (LICHSGFIN)
- भारतीय कंटेनर निगम लिमिटेड (CONCOR)
- महिंद्रा अँड महिंद्रा फायनान्स (M&MFIN)
- मॅक्स फायनान्शियल सर्विसेस (MFSL)
- पेज इंडिया (PAGEIND)
नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.
Web Title: Share Market Conditions On 31 January 2022 Which Share Is Beneficial Best Share To Buy
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..