Share Market - शेअर बाजारात मोठी घसरण; सेन्सेक्स 1 हजार अंकांनी कोसळला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Share Market

शेअर बाजार ५४०.३ अंकांच्या घसरणीसह ५८ हजार २५४.७९ अंकांवर उघडला होता.

शेअर बाजारात मोठी घसरण; सेन्सेक्स 1 हजार अंकांनी कोसळला

sakal_logo
By
टीम ई सकाळ

शेअर बाजारात आज सुरुवातीलाच सेन्सेक्समध्ये मोठी घसरण झाल्याचं दिसून आलं. सेन्सेक्स सकाळी नऊच्या सुमारास जवळपास ८०० निर्देशांकांनी कोसळला. तर १० वाजता निर्देशांकात १ हजारने घसरण झाली होती. सेन्सेक्स ५७ हजार ७८५.७२ अंकांवर पोहोचला होता. तर निफ्टिमध्येही ३११ अकांची घसरण होऊन १७ हजार २२५ अकांवर पोहोचला होता.

आज फार्मा शेअर वगळता निफ्टीचे सगळे सेक्टरल इंडेक्स घसरले आहेत. निफ्टी बँक इंडेक्स २.१५ टक्के, प्रायव्हेट बँक २.२७ टक्के, पीएसयू बँक २.५८ टक्के, मेटल इंडेक्स २.४४ टक्के, मीडिया इंडेक्स ३.३९ टक्के, ऑटो इंडेक्स २.४७ टक्क्यांनी घसरले.

सकाळी बाजार उघडला तेव्हा सेन्सेक्समध्ये एकही स्टॉक ग्रीन नव्हता. बाजार ५४०.३ अंकांच्या घसरणीसह ५८ हजार २५४.७९ अंकांवर उघडला होता. आशियाई बाजारातील घसरणीचा परिणाम देशातील बाजारातही दिसून येत आहे. तर गुरुवारी साप्ताहिक एक्सपायरीच्या दिवशी सुस्त सुरुवात केल्यानंतर, बाजारात मोठी तेजी पाहायला मिळाली. शांत सुरुवातीनंतर सेन्सेक्सने 454 अंकांची उसळी घेतली, निफ्टी 17536 वर बंद झाला, रिलायन्स 6% पेक्षा जास्त वाढला.

loading image
go to top