
दीपक नायट्रेटचे शेअर्स 25 टक्क्यांनी घसरले, शेअर्स घेण्याची नामी संधी ?
मुंबई : दुसर्या तिमाहीच्या निकालानंतर गुरुवारी दीपक नायट्रेटचे शेअर्स 10 टक्क्यांपर्यंत घसरले. सुरुवातीच्या व्यवहारात कंपनीचा शेअर्स 2,201 रुपयांवर होते. दीपक नायट्रेटचे शेअर्स या महिन्याच्या सुरुवातीला 3,020 रुपयांच्या उच्चांकावर पोहोचले होते. तेव्हापासून ते सुमारे 25 टक्क्यांनी घसरले आहे. सप्टेंबर तिमाहीत कंपनीचा एकूण निव्वळ नफा 254 कोटी रुपयांवर घसरला. जून तिमाहीत तो सुमारे 302 कोटी रुपये होता. जुलै-सप्टेंबर दरम्यान कंपनीचे एकूण उत्पन्न 1,681 कोटी रुपये झाले.
ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवाल यांनी दीपक नायट्रेट शेअर्सचे रेटिंग न्यूट्रल केले आहे. यासाठी त्यांनी आता सुमारे 2,300 रुपयांचे टारगेट दिले आहे. मात्र, येत्या काही महिन्यांत कंपनीच्या व्यवसायात सुधारणा होण्याची अपेक्षा मोतीलाल ओसवाल यांनी वर्तवली आहे. ही कंपनी पुढील तीन वर्षांत 1,800 कोटी रुपयांचा भांडवली खर्च (Capital Expenditure) करण्याची योजना आहे.
शेअर बाजार घसरणीवर असताना दिपक नायट्रेटचे शेअर्स घेण्याची नामी संधी असल्याचे इक्विटी99 चे म्हणणे आहे. कंपनीचे कर्ज कमी झाले असून करानंतरचा नफाही वाढला आहे. कंपनीमध्ये प्रमोटर्सची हिस्सेदारी 45.69 टक्के आहे.
शॉर्ट टर्ममध्ये हे शेअर्स आणखी खाली येण्याचा अंदाज आहे पण त्यानंतर दिपक नायट्रेटचे शेअर्स 3,000 रुपयांवर जाण्याचा अंदाज शेअर बाजार तज्ज्ञांनी दिला आहे.
नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्यप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.