शेअर बाजार कोसळला; सेन्सेक्स 1600 अंकांनी घसरला

वृत्तसंस्था
गुरुवार, 12 मार्च 2020

मार्च 2017 नंतर पहिल्यांदाच निफ्टी 10 हजारांच्या खाली आला आहे.

मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून शेअर बाजारातील चिंता वाढत आहे. बाजार सुरू होताच सेन्सेक्स तब्बल 1600 अंकानी घसरला. तर दुसरीकडे निफ्टीमध्येही 470 अंकाची घसरण झाली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कोरोनाची भीती अमेरिकेतील बाजारातही आहे. काल शेअर बाजारात 1460 अंकांची घसरण झाली होती. मार्च 2017 नंतर पहिल्यांदाच निफ्टी 10 हजारांच्या खाली आला आहे. 40 हजारापर्यंत पोहोचलेल्या सेन्सेक्समध्ये 33 हजारांपर्यंत घसरण झाली आहे.

मिड आणि स्मॉलकॅप शेअर्समध्ये विक्रीही पाहायला मिळात आहे. बीएसईचा मिडकॅप इंडेक्स 2.27 टक्के तर स्मॉलकॅप निर्देशांक 1.16 टक्क्यांनी घसरला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Share Market down by 1609 point 54 points