Paytm: पेटीएमच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याची सुवर्ण संधी; वाचा, तज्ज्ञ काय म्हणतात.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Paytm

Paytm: पेटीएमच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याची सुवर्ण संधी; वाचा, तज्ज्ञ काय म्हणतात..

पेटीएमची (Paytm) पॅरंट कंपनी वन 97 कम्युनिकेशंसचे (One 97 Communications)  शेअर्स सोमवारी बीएसईवर 1.30 टक्क्यांनी घसरून 643.45 रुपयांवर बंद झाले. यावर्षी ते 52 टक्क्यांहून अधिक घसरले आहेत, त्यामुळे गुंतवणूकदार या शेअर्समध्ये कधी तेजी येईल याची वाट पाहत आहेत. पण आता गुंतवणूकदारांची प्रतीक्षा संपणार असल्याचे बाजार तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

त्यामुळे पेटीएममध्ये गुंतवणूक करण्याची ही उत्तम संधी असल्याचे तज्ज्ञ सांगत आहे. कारण सध्याच्या किमतीत गुंतवणूक करून तुम्ही तुमचे पैसे दुप्पट करू शकता. देशांतर्गत ब्रोकरेज फर्म आयसीआयसीआय सिक्युरिटीजने गुंतवणुकीसाठी 1285 रुपयांची किंमत निश्चित केली आहे, जी सध्याच्या किंमतीपेक्षा जवळपास दुप्पट आहे. (golden opportunity in Paytm shares read what expert said )

हेही वाचा: Stock market: 100 रुपयांपेक्षा कमी किंमतीचा हा शेअर तज्ज्ञांचा फेव्हरीट...

One97 कम्युनिकेशन्सचे रेव्हेन्यू आणि मार्जिन प्रोफाइल हळूहळू सुधारत आहे. चालू आर्थिक वर्ष 2022-23 च्या दुसऱ्या तिमाहीत, जुलै-सप्टेंबर 2022 मध्ये, कंपनीला एप्रिल-जून 2022 च्या पहिल्या तिमाहीत 650 कोटी रुपयांच्या तुलनेत 570 कोटी रुपयांचा तोटा झाला आहे.

One97 कम्युनिकेशन्सचे प्रोसेसिंग चार्जेस कमी आहेत आणि नेट पेमेंट मार्जिन सुधारत असल्याचे ब्रोकरेज फर्मचे म्हणणे आहे. लेंडिंग बिझनेस व्‍यवसायात तेजी आहे आणि मंथली ट्रान्झॅक्शन युझर्समध्‍येही (MTUs) वाढ झाली आहे. याशिवाय ग्रॉस मर्चंडाईज व्हॅल्यूतही (GMV) सुधारणा दिसून येत आहे. या सर्व कारणांमुळे, ब्रोकरेज फर्मने यामध्ये गुंतवणूक करण्यासाठी 1285 रुपयांचे टारगेट दिले आहे.

हेही वाचा: Share Market Closing : आज शेअर बाजारात घसरण मात्र बँक निफ्टी तेजीत

पेटीएमचे शेअर्स गेल्या वर्षी लिस्ट झाले होते. हा आयपीओ गुंतवणूकदारांना 2150 रुपयांच्या किमतीत जारी करण्यात आला होता पण तो या पातळीच्या जवळपासही पोहोचू शकला नाही. गेल्या वर्षी ते 18 नोव्हेंबरला लिस्ट झाले होते आणि 1,961.05 रुपयांवर (Paytm शेअर किंमत) विक्रमी उच्चांक गाठला होता. तेव्हापासून ते दबावाखाली आहे आणि आतापर्यंत आयपीओ किमतीच्या तुलनेत 70 टक्क्यांनी घसरला आहे. या वर्षी 12 मे 2022 रोजी तो 511 रुपयांपर्यंत खाली घसरला होता.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.