esakal | शेअर बाजारात तेजीचे वारे
sakal

बोलून बातमी शोधा

Share Market

शेअर बाजारात तेजीचे वारे

sakal_logo
By
पीटीआय

मुंबई - शेअर बाजारातील तेजीचे वारे बुधवारी सलग तिसऱ्या सत्रात कायम राहिले. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स १९३ अंशांची उसळी घेऊन ३६ हजार ६३६ अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी ६५ अंशांनी वधारून ११ हजार ५३ अंशांवर बंद झाला.

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील निवळलेला तणाव आणि विद्यमान सरकारला आगामी निवडणुकीसाठी तयार झालेले पोषक वातावरण यामुळे शेअर बाजारात आज तेजीचे वारे निर्माण झाले आहे. याचबरोबर जागतिक पातळीवर अमेरिका आणि चीन यांच्यातील व्यापार वादावर तोडगा निघण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. यामुळे जागतिक शेअर बाजारांमध्ये तेजीची लाट आली. सेन्सेक्‍समध्ये आज बजाज फायनान्सच्या समभागात सर्वाधिक २.६० टक्के वाढ झाली, तर त्याखालोखाल आयसीआयसीआय बॅंक २.५५ टक्के आणि रिलायन्स इंडस्ट्रीज २.१५ टक्के वाढ झाली. याचबरोबर वेदांता, पॉवर ग्रीड, एचडीएफसी, एनटीपीसी, आयटीसी, भारती एअरटेल, कोल इंडिया, एम अँड एम, एसबीआय, बजाज ऑटो, एल अँड टी, कोटक बॅंक आणि इन्फोसिस यांच्या समभागात २ टक्‍क्‍यांपर्यंत वाढ झाली. 

टाटा मोटर्सच्या समभागात २.८१ टक्के, ॲक्‍सिस बॅंक १.७२ टक्के, एचयूएल १.३८ टक्के, एचसीएल टेक १.२४ टक्के आणि हिरोमोटोकॉर्प ०.९६ टक्का घसरण नोंदविण्यात आली. ऊर्जा, ग्राहकोपयोगी वस्तू, दूरसंचार, वीज आणि आरोग्यसुविधा क्षेत्रातील कंपन्यांच्या  समभागात आज १.७३ टक्‍क्‍यापर्यंत वाढ झाली. निफ्टीने आज ११ हजार अंशांची पातळी ओलांडली. मिड आणि स्मॉल कॅप कंपन्यांकडे गुंतवणूकदारांचा आज ओढा होता.

शेअर बाजारातील तेजीचे वातावरण कायम राहण्याची शक्‍यता आहे. ‘फेडरल रिझर्व्ह’चे पतधोरण आणि अमेरिका-चीन व्यापार करार यावर शेअर बाजाराची पुढील दिशा मोठ्या प्रमाणावर अवलंबून असेल. 
- विनोद नायर, संशोधन प्रमुख, जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेस

loading image