Share Market: फक्त 18 हजारात गुंतवणुकदार बनले कोट्यधीश, 'या' शेअरचा छप्परफाड रिटर्न | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

share market

Share Market: फक्त 18 हजारात गुंतवणुकदार बनले कोट्यधीश, 'या' शेअरचा छप्परफाड रिटर्न

युपीएल लिमिटेड (UPL Ltd) ही भारताबरोबरच जगातील सर्वात मोठ्या ऍग्रोकेमिकल कंपन्यांपैकी एक आहे. गेल्या 2 दशकांमध्ये या कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना भरघोस परतावा दिला आहे आणि त्यांना कोटींचा नफा मिळवून दिला आहे. ज्या गुंतवणुकदारांनी या शेअरवर विश्वास ठेऊन लाँग टर्मसाठी गुंतवणूक केली त्यांना कोट्यवधींचा फायदा झाल्याचे नुकतेच समोर आले आहे.  (share market investors became Billionaire this share give best return)

यूपीएल लिमिटेडचे नाव आधी युनायटेड फॉस्फरस लिमिटेड असे होते. ही एक भारतीय मल्टीनॅशनल कंपनी आहे जी कृषी रसायने, औद्योगिक रसायने, केमिकल इंटरमीडिएट्स आणि स्पेशालटी केमिकलचे उत्पादन आणि मार्केटिंग करते. याव्यतिरिक्त, कंपनी पीक संरक्षणाशी संबंधित उपाय देखील प्रदान करते.

शुक्रवारी 16 सप्टेंबर 2022 रोजी एनएसईवर युपीएल लिमिटेडचे (UPL Ltd) शेअर्स 704.55 रुपयांवर बंद झाले. पण, 20 वर्षांपूर्वी जेव्हा 5 जुलै 2022 रोजी युपीएल लिमिटेडच्या शेअर्सनी पहिल्यांदाच एनएसईवर व्यापार सुरू केला तेव्हा त्याची किंमत फक्त 1.20 रुपये होती. तेव्हापासून त्याची किंमत सुमारे 58,612.50 टक्क्यांनी वाढली आहे.

एखाद्या गुंतवणूकदाराने 20 वर्षांपूर्वी युपीएल लिमिटेडच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते, तर आज ते  58,612.50% ने वाढून 5.87 कोटी रुपये झाले असते. दुसरीकडे, एखाद्या गुंतवणूकदाराने त्यावेळी केवळ 18 हजार रुपये गुंतवले असते, तर आज त्या 18 हजार रुपयांचे 1 कोटी 5 लाख रुपये झाले असते. पण गेल्या एका महिन्यात हा शेअर सुमारे 10.87 टक्क्यांनी घसरले आहे. त्याचवेळी, गेल्या वर्षभरात त्याची किंमत सुमारे 5 टक्क्यांनी घसरली आहे. तर गेल्या 5 वर्षात त्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना सुमारे 31 टक्के परतावा दिला आहे.

अरिस्ता लाईफसायन्सचे (Arysta LifeScience) अधिग्रहण केल्यानंतर यूपीएल लिमिटेड आता जगातील पाचवी सर्वात मोठी ऍग्रोकेमिकल कंपनी बनली आहे. ग्लोबल फूड सिस्टीम्समधील ही एक आघाडीची कंपनी आहे. गेल्या आर्थिक वर्षात त्याची वार्षिक कमाई 40163.56 कोटी होती.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.