esakal | शेअर मार्केटमध्ये उसळी; सेन्सेक्समध्ये ८०० अंकानं वाढ, निफ्टीही १४ हजारांच्या पुढे
sakal

बोलून बातमी शोधा

शेअर मार्केटमध्ये उसळी; सेन्सेक्समध्ये ८०० अंकानं वाढ, निफ्टीही १४ हजारांच्या पुढे

होळी सणानंतर आज भारतीय शेअर मार्केटमध्ये मोठी उसळी पाहायला मिळाली

शेअर मार्केटमध्ये उसळी; सेन्सेक्समध्ये ८०० अंकानं वाढ, निफ्टीही १४ हजारांच्या पुढे

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

Share Market News Today : होळी सणानंतर आज भारतीय शेअर मार्केटमध्ये मोठी उसळी पाहायला मिळाली. सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये मंगळवारी मोठी उसळी पाहायला मिळाली. बीएसईचा (BSE) प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स ८०० अंकांच्या वाढीसह ४९,९०० च्या पातळीवर व्यापार करत आहे. त्याशिवाय निफ्टी निर्देशांक ५० अंकांच्या वाढीसह १४,७५० च्या पातळीवर आहे. आजच्या व्यवसायात बँका, धातू, FMCG आणि वित्तीय शेअर्समध्ये मोठी खरेदी दिसून आली. भारतीय बाजाराला झळाळी मिळत असताना अमेरिकन बाजारात मिश्र व्यापार दिसून आला.  

मंगळवारी सकाळपासून आशियाई बाजारात संमिश्र व्यवसाय सुरू असल्याचं चित्र आहे. SGX Nifty समभागात विक्री करतायेत. त्याशिवाय सोमवारी Dow Jones नं नवीन विक्रम नोंदवला पण Nasdaq आणि S&P मध्ये थोडी घसरण पाहायला मिळाली.  दिग्गज २९ शेअरच्या सेन्सेक्समध्ये मंगळवारी मोठी उसळी पाहायला मिळाली. आज फक्त M&M मध्ये थोडीफार घसरण पाहायला मिळाली आहे.  त्याशिवाय सर्वच मोठ्या कंपनीच्या सेन्सेक्समध्ये वाढ पाहायला मिळाली.  टायटन, HUL, ONGC, NTPC, Dr Reddy, HDFC, Bajaj Finsv, ITC, TCS, Reliance, ICICI Bank, SBI, LT आणि भारती एअरटेलमध्ये आज सर्व  गुंतवणूकदारांनी रस दाखवल्याचं दिसलं. या कंपन्याचे शेअर सर्वात जास्त विकले गेले.

अर्थविश्वातील बातम्या वाचण्यासाठी इथं क्लिक करा ....

सेक्टोरल इंडेक्समधील सर्वच क्षेत्रांमध्ये मोठी वाढ पाहायला मिळाली. बीएसआय ऑटो, बँक निफ्टी, कॅपिटल गुड्स, कंझ्युमर ड्यूरेबल्स, एफएमसीजी, हेल्थकेअर, आयटी, मेटल, ऑईल अँड गॅस, पीएसयू आणि टेक क्षेत्र तेजीत असल्याचं मंगळवारी पाहायला मिळालं.  
 

loading image
go to top