
'या' शेअरचा एका महिन्यात 63% परतावा; तोट्यातून साकारला फायदा
सोमवारी शेअर बाजारात मोठी घसरण झाली असली तरी असे काही शेअर्स आहेत ज्यांनी गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला आहे. असाच एक स्टॉक मॅरेथॉन नेक्स्टजेन रियल्टी (Marathon Nextgen) आहे, जो इंट्राडे दरम्यान बीएसईवर 12 टक्क्यांपर्यंत वाढून 194.85 रुपये झाला, जी त्याची जून 2018 नंतरची सर्वोच्च लेव्हल आहे. त्यानंतर काही अंशी घसरणीसह हा शेअर 6 टक्क्यांच्या मजबूतीसह 183 रुपयांच्या आसपास ट्रे़ड करत होता.
एका वर्षात शेअर्समध्ये 166 टक्के वाढ
गेल्या एका महिन्यात या शेअरमध्ये जवळपास 63 टक्क्यांची वाढ झाली आहे. गेल्या एका वर्षात या शेअरने 166 टक्के तगडा परतावा दिला आहे. 18 मे 2022 रोजी, बोर्डाने प्रमोटर्स आणि नॉन-प्रमोटर्सना प्रिफरेंशियल इश्यू म्हणून 135 रुपये प्रती वॉरंट दराने 48 लाख कन्व्हर्टिबल वॉरंट अलॉट करायला मान्यता दिली होती.
हेही वाचा: विकास अन् परंपरा एकत्र पुढे गेले पाहिजे - PM मोदी
तोट्यातून नफा साकारला
मार्च 2022 ला संपलेल्या तिमाहीत, कंपनीने 23.26 कोटी रुपयांचा कंसॉलिडेटेड नेट प्रॉफिट दिला, जो मागील वर्षीच्या तिमाहीत 7.57 कोटी होता. त्याच वेळी, या कालावधीत महसूल दुपटीने वाढून 165 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. गेल्या सहा महिन्यांत, मॅरेथॉन नेक्स्टजेनने (Marathon Nextgen) 85 टक्क्यांची जोरदार रॅली पाहिली आहे.
कोणते प्रकल्प सुरु
मॅरेथॉन नेक्स्टजेन रियल्टी (MNRL) आणि मॅरेथॉन रियल्टी प्रायव्हेट लिमिटेडचे (MRPL) एकूण तीन प्रकल्प निर्माणाधीन आहेत. मॅरेथॉन फ्यूचरएक्स (कमर्शियल), मॅरेथॉन एम्ब्रेस (निवासी) आणि मॅरेथॉन कार्लो अँड प्लाझा (व्यावसायिक आणि निवासी) त्यांचे एकूण विक्रीयोग्य क्षेत्र 20.9 लाख चौरस फूट आणि अंदाजे किंमत 2,068 कोटी रुपये आहे. एमएनआरएलचा प्रोजेक्ट मॅरेथॉन फ्यूचरएक्स मुंबईच्या लोअर परेल भागात आहे, जो सर्वात प्रतिष्ठित समजला जातो.
हेही वाचा: आणखी एक तारीख पाहू; सुप्रिया सुळेंचा भाजपला टोला
नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.
Web Title: Share Market Nifty Sensex This Share 63 Percent Return
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..