
Share Market: निवडणूक निकालांनंतर सेन्सेक्समध्ये 246.39 तर निफ्टीमध्ये 66.10 अंकांची घसरण
Share Market Latest Updates: कालच पाच राज्यांच्या निवडणूकांचे निकाल लागले. त्यानंतर आजच्या दिवशी शेअर बाजाराची सुरुवात किंचित घसरणीने झाली. सेन्सेक्स (Sensex) 246.39 अंकांच्या घसरणीसह 55218.78 वर सुरु झाला, तर निफ्टी (Nifty) 66.10 अंकांच्या घसरणीसह 16528 वर सुरु झाला.
हेही वाचा: Share Market: कोणते 10 शेअर्स दाखवणार कमाल? आज शेअर बाजारात काय असेल स्थिती?
दरम्यान गुरुवारी सलग तिसऱ्या दिवशी बाजारात वाढ दिसून आली. कच्च्या तेलाच्या किमतीत काहीशी घसरण झाली असून जागतिक संकेतही सुधारले आहेत. त्याचा परिणाम भारतीय बाजारावर दिसून आला. सकारात्मक जागतिक संकेतांमध्ये बाजारात गॅप-अप ओपनिंग दिसले आणि त्यानंतर भाजपच्या विजयाच्या शक्यतांसोबतच बाजाराची तेजीही वाढत गेली. पण, व्यवहाराच्या शेवटच्या तासात काही प्रमाणात नफावसुली झाली.
हेही वाचा: Share Market: शेअर बाजारात तेजी; सेन्सेक्स अन् निफ्टीमध्ये झाली एवढ्या अंकांची वाढ
व्यवहाराच्या शेवटी, सेन्सेक्स 817.06 अंकांच्या अर्थात 1.50 टक्क्यांच्या वाढीसह 55,464.39 वर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टी 249.55 अंकांच्या अर्थात 1.53 टक्क्यांच्या वाढीसह 16,594.90 वर बंद झाला. दरम्यान, रशिया आणि युक्रेनचे परराष्ट्र मंत्री तुर्कस्तानमध्ये भेटणार असल्याची बातमी आली. त्यामुळे दोन्ही देशांमध्ये चर्चेच्या माध्यमातून चर्चा होण्याची शक्यता होती.
Web Title: Share Market Opening After Election
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..