Share Market: शेअर बाजारात तेजी; सेन्सेक्स अन् निफ्टीमध्ये वाढ

काल अमेरिकन बाजारांमध्येही चांगली उसळी पाहायला मिळाली आणि त्याचा परिणाम जागतिक बाजारातील भावावर दिसून येत आहे.
Share Market Latest Updates | Stock Market News
Share Market Latest Updates | Stock Market NewsSakal

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर वाढल्याने त्याचा परीणाम भारतीय शेअर बाजारावर दिसून येत आहे. मात्र आज शेअर बाजार तेजीसह उघडला आहे आणि प्री-ओपनिंगमध्येच सेन्सेक्स आणि निफ्टी चांगल्या वाढीसह व्यवहार करताना दिसत आहे. काल अमेरिकन बाजारांमध्येही चांगली उसळी पाहायला मिळाली आणि त्याचा परिणाम जागतिक बाजारातील भावावर दिसून येत आहे. यात एसबीआय लाईफ, टाटा पॉवर,अरबिंदो फार्मा (Aurobindo Pharma) फोकसमध्ये दिसून येत आहे. (share market opening todays update )

Share Market Latest Updates | Stock Market News
आठवड्याच्या सुरवातीलाच बाजारात तेजी! आज कोणत्या 10 शेअर्सवर लक्ष केंद्रित कराल?

आजच्या शेअर मार्केटमध्ये सेन्सेक्स २२१.२१ अंकांनी वाढल्यानंतर ५७,८१४ वर उघडला आणि निफ्टी ७५.२० अंकांनी वाढून १७,२९७ वर उघडला. सुरुवातीच्या काळात सेन्सेक्सने ५७, ९०० चा टप्पा ओलांडला होता तर त्याच वेळी निफ्टीने सुरुवातीलाच १७,३०० ची पातळी ओलांडली होती. (Share Market Latest Updates)

ऑटो, बँक, ऑइल आणि गॅस आणि मेटल स्टॉक्सच्या मजबूत सपोर्टमुळे शेअर बाजार (Share Market) सोमवारी तेजीसह बंद झाला. सेन्सेक्स (Sensex) 231.29 अंकांनी अर्थात 0.40 टक्क्यांनी वाढून 57,593.49 वर आणि निफ्टी (Nifty) 69 अंकांनी म्हणजेच 0.40 टक्क्यांनी वाढून 17,222 बंद झाला.

Share Market Latest Updates | Stock Market News
पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीचं सत्र सुरुच; जाणून घ्या आजचे दर

आज कसा असेल शेअर बाजाराचा मूड ?

बाजारातील अस्थिरतेमागची दोन महत्त्वाची कारणे आहेत. पहिले कारण वस्तूंच्या किमतीत झालेली वाढ, आणि दुसरे कारण भविष्यात कमाईच्या वाढीमध्ये येणारी घसरण असल्याचे जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे विनोद नायर म्हणाले. उत्पादनांच्या किंमती सतत वाढत आहेत आणि त्या आणखी वाढण्याची अपेक्षा आहे, ज्यामुळे मागणी आणि मार्जिनवर परिणाम होत असल्याचेही ते म्हणाले. विशेषत: चीनमध्ये वाढत्या कोविड प्रकरणांमुळे अनिश्चिततेमुळे कमजोरी देखील वाढली. तर रशिया आणि युक्रेनमधील शत्रुत्व संपुष्टात आल्याने वस्तूंच्या किमतीतील अस्थिरता कमी होईल आणि पुरवठ्यातील अडचणी कमी होतील असेही ते म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com