share market: शेअर बाजारात मोठी उसळी; सेन्सेक्स 331 तर निफ्टी 110 अंकांवर

सुरवातीच्या सत्रापासून बाजारात मोठी तेजी
Share Market Updates | Stock Market News
Share Market Updates | Stock Market NewsE Sakal

शेअर बाजारात सोमवारपासून मोठी तेजी दिसून येत आहे. काल सुरवातीच्या सत्रापासून बाजारात मोठी तेजी दिसून येत आहे. आजही खरेदीचा जोर कायम असल्याचे दिसून येत आहे. सेन्सेक्स 331 अंकांच्या तेजीत असून निफ्टी 110 अंकांवर व्यवहार करत आहे. सेन्सेक्सने आज पुन्हा एकदा 60,000 हजार अंकांचा टप्पा ओलांडला. गेल्या दोन दिवसांपासून सेन्सेक्स 60,000 वर व्यवहार करत आहे. तर सेन्सेक्समध्ये आज 0.61 टक्क्यांची वाढ होऊन तो 60,479 अंकांवर सुरू झाला आहे. तर निफ्टीमध्ये 0.63 टक्क्यांची वाढ होऊन तो 18,049 अंकांवर सुरू झाला आहे.

काल शेअर बाजारात सेन्सेक्स 240 अंकांच्या तेजीत असून निफ्टी 74 अंकांवर दिसून आला. तर सेन्सेक्समध्ये 0.70 टक्क्यांची वाढ होऊन तो 60,204 अंकांवर सुरू झाला होता. तर निफ्टीमध्ये 0.68 टक्क्यांची वाढ होऊन तो 17,957 अंकांवर सुरू झाला होता.

आज कशी असेल बाजाराची स्थिती ?
अलीकडच्या ट्रेडिंग सत्रात कच्च्या तेलाच्या किमती घसरल्याचे कोटक सिक्युरिटीजचे श्रीकांत चौहान म्हणाले. याशिवाय डॉलर इंडेक्सही नरमला आहे. या सगळ्याचा बाजारावर सकारात्मक परिणाम झाला. तांत्रिकदृष्ट्या, निफ्टीने त्याच्या सर्वात जवळच्या रझिस्टेंस लेव्हलच्या जवळ एक शूटिंग स्टार पॅटर्न (shooting star) तयार केला आहे.

आता जर निफ्टी 17850 च्या खाली घसरला तरच ट्रेंड बदलेल अशी अपेक्षा आहे. असे झाले नाही तर निफ्टी 18,000 आणि 18,100 चा स्तर ओलांडताना दिसेल. दुसरीकडे, निफ्टी 17,850 च्या खाली घसरला तर त्यात 17,750-17,700 ची पातळी दिसू शकते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com