Share Market: तेजीला मोठा ब्रेक; सेन्सेक्स 554 तर निफ्टी 158 अंकांनी घसरला

पहिल्या सत्रात शेअर बाजारात मोठी घसरण
Share Market Latest Updates
Share Market Latest Updatesesakal

शेअर बाजारात गेल्या दोन दिवसात मोठी तेजी दिसून आली. पण आज पहिल्या सत्रात शेअर बाजारात मोठी घसरण झाल्याचे दिसून आले आहे. अमेरिकेतील शेअर बाजारातील पडझडीचा परिणाम भारताच्या शेअर बाजारावर झाला आहे. पहिल्या सत्रात सेन्सेक्समध्ये जवळजवळ एक हजार अंकांची घसरण दिसून आली. तर, निफ्टी 298 अंकांची मोठी घसरण झाली आहे.

सेन्सेक्समध्ये 475 अंकांची घसरणी दिसून आली, तर निफ्टीमध्येही 133 अंकांची घसरण झाली आहे. तर सेन्सेक्समध्ये आज 0.78 टक्क्यांची घसरण होऊन तो 60,095 अंकांवर सुरू झाला आहे. तर निफ्टीमध्ये 0.73 टक्क्यांची घसरण होऊन तो 17,937 अंकांवर सुरू झाला आहे.

अमेरिकेत महागाई वाढल्याने शेअर बाजारात घसरण झाली होती.त्याचा परिणाम भारतीय शेअर बाजारात दिसून आला आहे.

आज कशी असेल बाजाराची स्थिती ?

तांत्रिक दृष्टीकोनातून, निफ्टीने 18000 चा शॉर्ट टर्म रझिस्टेंस तोडत त्याच्या वर बंद होण्यात यश मिळवल्याचे कोटक सिक्युरिटीजच्या श्रीकांत चौहान म्हणाले. निर्देशांकाने डेली आणि इंट्राडे चार्ट्सवर एक अपट्रेंड कंन्टीन्यूएशन फॉर्मेशनमध्ये सातत्य दाखवले आहे.

जे सध्याच्या पातळीपेक्षा आणखी वाढीचे लक्षण आहे. आता निफ्टीला 18000 आणि 17925 वर सपोर्ट दिसत आहे तर 18150 -18200 वर रझिस्टन्स दिसत आहे. जर निफ्टी 17925 च्या खाली घसरला तर ही कमजोरी 17850-17800 पर्यंत जाऊ शकते.

Related Stories

No stories found.
Sakal
www.esakal.com