
Share Market: घसरणीला ब्रेक; शेअर बाजारात पुन्हा उसळी
दोन दिवसाच्या तेजीनंतर काल दिवसभरात शेअर बाजारात मोठी घसरण झाली होती. पण आज सकाळी शेअर बाजार सुरू होताच बाजारात तेजी पाहायला मिळाली. अमेरिकेतील महागाई आणि शेअर बाजारातील घसरण याचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर दिसून येत होता. आज शेअर बाजाराच्या पहिल्या सत्रात सेन्सेक्समद्धे 210 अंकाची तेजी दिसून आली आहे. निफ्टी 72 अंकाच्या तेजीसह व्यवहार करताना दिसत आहे. सेन्सेक्समध्ये आज 0.21 टक्क्यांची वाढ होऊन तो 60,470 अंकांवर सुरू झाला आहे. तर निफ्टीमध्ये 0.29 टक्क्यांची वाढ होऊन तो 18,061 अंकांवर सुरू झाला आहे.
बुधवारच्या व्यवहारातील सुरुवातीच्या कमजोरीनंतर बाजारात खालच्या स्तरावरून मजबूत रिकव्हरी दिसून आली आणि त्यात 1100 हून अधिक अंकांची सुधारणा दिसून आली. पण, शेवटच्या ट्रेडिंग तासात पुन्हा बाजाराने नफा गमावला आणि मागील बंदच्या तुलनेत 0.4 टक्क्यांनी घसरला. यासोबतच सलग 4 दिवस बाजारातील तेजी गमावली.
व्यवहाराच्या शेवटी सेन्सेक्स 224.11 अंकांनी म्हणजेच 0.37 टक्क्यांनी घसरून 60346.97 वर बंद झाला. तोच निफ्टी 66.30 अंक म्हणजेच 0.37 टक्क्यांनी घसरला आणि 18004 च्या पातळीवर बंद झाला.