Share Market: आठवड्याच्या शेवटच्या दिवशी बाजार तेजीत सुरू, मात्र गुंतवणूकदारांमध्ये धाकधूक कायम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

share market update

Share Market: आठवड्याच्या शेवटच्या दिवशी बाजार तेजीत सुरू, मात्र गुंतवणूकदारांमध्ये धाकधूक कायम

गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारात अस्थिरता दिसून येत आहे. शुक्रवारी विकली एक्सपायरी दिवशी बाजारात अस्थिरतेचं वातावरण दिसून आलं. शेअर बाजार घसरणीसह बंद झाला तर आजही आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शेअर बाजाराच्या पहिल्या सत्रात घसरण दिसून येत आहे.

सेन्सेक्स 75 अंकाच्या तेजीसह 61,825 वर सुरू झाला तर निफ्टी 30 अंकाच्या तेजीसह 18,374 वर सुरू झाला तर शुक्रवारी शेवटच्या सत्रात सेन्सेक्स 230 अंकांनी तर निफ्टी 66 अंकांनी घसरून बंद झाला होता.

हेही वाचा: Liquor stocks :व्होडका-व्हिस्की विकणाऱ्या कंपनीने गुंतवणूकदारांना केले मालामाल...

आज पहिल्या सत्रात शेअर्समध्ये 30 तेजी तर 20 शेअर्समध्ये घसरण दिसून येत आहे. विशेषत: आयटी शेअर्समध्ये तेजी दिसून येत आहे. शुक्रवारी पीएसयू बँक आणि इन्फ्रा शेअर्समध्ये खरेदी झाली. दुसरीकडे, ऑटो आणि आयटी शेअर्समध्ये विक्री झाली. तर मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांक फ्लॅट राहिले. फार्मा, रियल्टी आणि एनर्जी इंडेक्स लाल चिन्हात बंद झाले. 

हेही वाचा: Share Market : एकाच वर्षात या स्टॉकने दिला 300 टक्के बंपर रिटर्न

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते ?

टाटा कंझ्युमर्स (TATACONSUM)
अदानी एन्टरप्रायझेस (ADANIENT)
एल अँड टी (LT)
पॉवरग्रीड (POWERGRID)
एचडीएफसी लाईफ (HDFCLIFE)
फेडरल बँक (FEDERALBNK)
आयसीआयसीआय बँक (ICICIBANK)
ऍक्सिस बँक (AXISBANK)
बँक ऑफ बडोदा (BANKBARODA)
पीएनबी (PNB)