Share Market: शेअर बाजारात गुंतवणूकदारांची चांदी; सेन्सेक्स 550 तर निफ्टी 185 अंकांनी वधारला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Share Market Updates

Share Market: शेअर बाजारात गुंतवणूकदारांची चांदी; सेन्सेक्स 550 तर निफ्टी 185 अंकांनी वधारला

Share Market: सणासुदीच्या तोंडावर शेअर बाजारात गुंतवणूकदारांची चांदी झाली आहे. आठवड्याच्या सलग दुसऱ्या दिवशी बाजारात चांगलीच तेजी दिसून येत आहे. आज शेअर बाजारातील व्यवहाराची सुरुवात झाल्यानंतर सेन्सेक्स आणि निफ्टी निर्देशांक चांगल्या अंकांनी वधारले आहेत. सेन्सेक्स 550 अंकांनी तर, निफ्टीने 185 अंकांनी वधारला आहे. (share market opening updates)

आज शेअर बाजारातील व्यवहाराची सुरवात सकारात्मक झाली आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 584 अंकांच्या तेजीसह 58,995 अंकांवर व्यवहार करत होता. तर, निफ्टी 168 अंकांच्या तेजीसह 17,480अंकांवर व्यवहार करत होता.

हेही वाचा: बाजार सुरू होण्याआधी जाणून घ्या आज कोणते 10 शेअर्स करतील परफॉर्म?

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते ?

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBIN)
बजाज फिनसर्व्ह (BAJAJFINSV)
ऍक्सिस बँक (AXISBANK)
एनटीपीसी (NTPC)
आयसीआयसीआय बँक (ICICIBANK)
भारत फोर्ज (BHARATFORG)
इंडियन हॉटेल्स (BHARATFORG)
आयडीएफसी फर्स्ट बँक (IDFCFIRSTB)
ए यू बँक (AUBANK)
भारतीय कंटेनर निगम (CONCOR)