Share Market: शेअर बाजारात जबरदस्त उसळी; सेन्सेक्स 746 अंकांनी वधारला

सेन्सेक्समध्ये 746 टक्क्यांची वाढ तर निफ्टीमध्ये 226 टक्यांची वाढ
Share Market Updates
Share Market Updatesesakal

शेअर बाजारात काल चढ उतार पाहायला मिळाला. सकाळच्या सत्रात शेअर बाजार गडगडला मात्र दुपारच्या सत्रात शेअर मार्केटमध्ये तेजी दिसून आली आहे. आजही शेअर बाजारात मोठी उसळी दिसून येत आहे. शेअर बाजारात सेन्सेक्समध्ये 746 टक्क्यांची वाढ दिसून आली तर निफ्टीमध्ये 226 टक्यांची वाढ दिसून आली आहे. आज सेन्सेक्स 1.26 टक्क्यांच्या तेजीसह 59,887 वर सुरू झाला तर निफ्टी 1.28 टक्क्यांच्या तेजीसह 17,848 वर सुरू झाला आहे. आज शेअर बाजारातील 49 शेअरमध्ये चांगली तेजी असून 1 शेअर घसरणीसह व्यवहार करत आहेत.

आज कशी असेल बाजाराची स्थिती ?

तांत्रिकदृष्ट्या घसरणीनंतर निफ्टीला 17450 जवळ सपोर्ट मिळाला. यानंतर निफ्टी 17580-17665 च्या दरम्यान व्यवहार करताना दिसल्याचे कोटक सिक्युरीटीजचे श्रीकांत चौहान म्हणाले. जर निफ्टी 17550 च्या वर ट्रेड करत असेल तर पुल-बॅक फॉर्मेशन चालू राहण्याची शक्यता आहे. यावर निर्देशांक 17675 च्या 20 दिवसांच्या SMA पातळीला स्पर्श करू शकतो. निफ्टी वर गेल्यास 17800 पर्यंत जाऊ शकतो. दुसरीकडे, निफ्टी 17550 च्या खाली गेल्यास, निफ्टी पुन्हा 17450- 17400 च्या पातळीवर सरकू शकतो.

निफ्टीच्या सावध ट्रेंडमध्ये बाजारात चांगली रिकव्हरी झाल्याचे मेहता इक्विटीज प्रशांत तापसे म्हणाले.  तांत्रिकदृष्ट्या, निफ्टीला सर्वात मोठा सपोर्ट  17429 वर असेल. याच्या खाली निफ्टी 17161 च्या खालच्या पातळीवर जाऊ शकतो. वरच्या बाजूने, निफ्टीला 17867 वर रझिस्टंस आहे. जर ही पातळी ओलांडली तर त्याला 18115 स्तरावर रझिस्टंस आहे.

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते ?

महिन्द्रा अँड महिन्द्रा (M&M)
बजाज फायनान्स (BAJAJFIN)
अदानी पोर्ट्स (ADANIPORTS)
एसबीआय लाईफ (SBILIFE)
हिंदुस्थान युनिलिव्हर (HINDUNILVR)
झी एन्टरटेन्मेंट लिमिटेड (ZEEL)
हिंदुस्थान पेट्रोलियम (HINDUPETRO)
ऍस्ट्रल (ASTRAL)
भारतीय कंटेनर निगम (CONCOR)
अशोक लेलँड (ASHOKLEY

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com