Share Market : आठवड्याच्या शेवटच्या दिवशी बाजार तेजीत, मात्र गुंतवणूकदारांमध्ये धाकधूक कायम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

share market update

Share Market : आठवड्याच्या शेवटच्या दिवशी बाजार तेजीत, मात्र गुंतवणूकदारांमध्ये धाकधूक कायम

गेल्या आठवड्याभरापासून शेअर बाजारात अस्थिरता कायम होती. मात्र गुरुवारी शेअर बाजारात तेजीत बंद झाला. आज सुद्धा शेअर बाजार तेजी दिसून देत असून येते. शेअर बाजार आज तेजीत सुरू झाला.

आज सेन्सेक्स 110 अंकांच्या तेजीसह 62,681 वर सुरू झाला तर निफ्टी 33 अंकाच्या तेजीसह 18,642 वर सुरू झाला. आज 34 शेअर्समध्ये तेजी तर 16 शेअर्समध्ये घसरण दिसून येत आहे. (share market opening update 9 December 2022)

आज आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शेअर बाजारात तेजी असल्याने गुंतवणूकदारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे तरीसुद्धा दिवसभर धाकधूक कायम राहील.

गुरुवारी निफ्टीने दोन दिवसांची घसरण ब्रेक केली. निफ्टी 18,600 च्या महत्त्वाच्या पातळीच्या किंचित वर बंद झाला. सकाळी 18,571 वर फ्लॅट उघडल्यानंतर निर्देशांकाने 18,625-18,537 च्या श्रेणीत व्यवहार केला. गुरुवारी तो मागील दिवसाच्या बंदच्या तुलनेत 49 अंकांनी वाढून 18,609 वर बंद झाला.

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते ?

ऍक्सिस बँक (AXISBANK)

इंडसइंड बँक (INDUSINDBK)

आयशर मोटर्स (EICHERMOT)

एल अँड टी (LT)

हिंदाल्को (HINDALCO)

भारत फोर्ज (BHARATFORG)

ऍस्ट्रल (ASTRAL)

भारतीय कंटेनर निगम (CONCOR)

आयडीएफसी फर्स्ट बँक (IDFCFIRSTB)

हिंदुस्थान पेट्रोलियम (HINDPETRO)