esakal | Share Market : राकेश झुनझुनवालांची एका महिन्यात ९०७ कोटींची कमाई
sakal

बोलून बातमी शोधा

share market

राकेश झुनझुनवाला यांना टाटा उद्योग समुहाच्या दोन कंपन्यांच्या शएअर्समधून एका महिन्यात तब्बल ९०७ कोटींची कमाई झाली आहे.

शेअर मार्केट : राकेश झुनझुनवालांना एका महिन्यात झाला ९०७ कोटींचा फायदा

sakal_logo
By
टीम ई सकाळ

शेअर मार्केटचे बिगबुल अशी ओळख असलेल्या राकेश झुनझुनवाला यांना टाटा उद्योग समुहाच्या दोन कंपन्यांच्या शएअर्समधून एका महिन्यात तब्बल ९०७ कोटींची कमाई झाली आहे. टाटा मोटर्स आणि टायटनच्या शेअर्समधून वर्षाच्या सुरुवाती पासून ९ महिन्यात त्यांनी ८० टक्के रिटर्न मिळवले आहे. टाटा मोटर्समध्ये राकेश झुनझुनवाला यांची १.१४ टक्के भागिदारी आहे. त्यांच्याकडे जवळपास ३.७७ कोटी शेअर्स आहेत. कंपनीच्या या शेअर्समधून गेल्या ९ महिन्यात ८० टक्के रिटर्न दिले आहेत. तर दुसऱ्या बाजुला सेन्सेक्सने फक्त २४.४२ टक्के रिटर्न दिले आहेत.

झुनझुनवाला यांनी गेल्या वर्षी सप्टेंबर २०२० ध्ये टाटा मोटर्सचे जवळपास ४ कोटी शेअर्स खरेदी केली होती. त्यानंतर गेल्या वर्षभरात त्यांना शेअर्समधून १५०.८४ रिटर्न मिळाला आहे. तर गेल्या महिन्याभरात हेच शेअर्स १५.६१ टक्के वाढले आहेत. बुधवारी २९ सप्टेंबरला शेअर्सची किंमत बीएसीवर ३३.३५ रुपये इतकी होती.

हेही वाचा: मुंबई : निर्देशांकांची दुसरी घसरण सेन्सेक्स 254 अंश घसरला

टाटा समुहाच्या टायटनमधील शेअर्समध्येही झुनझुनवालांना फायदा झाला आहे. या वर्षी आतापर्यंत जवळपास ३६.८९ टक्के वाढ झाली आहे. जूनच्या तिमाहीमध्ये राकेश झुनझुनवाला आणि त्यांच्या पत्नीकडे टायटनचे ४.२६ कोटी शेअर्स होते. एक वर्षात यामध्ये ८४.६३ टक्के वाढ झाली तर गेल्या महिन्याभरात १८ टक्के रिटर्न मिळाला आहे.

बीएसईवर बुधवारी टायटनचे शेअर्स २१६५.८ रुपयांवर पोहोचले होते. तर बाजार बंद होताना २१५५ रुपयांवर स्थिर झाले. याशिवाय एनएसईवर शेअर्सची किंमत २१४७.५० रुपये इतकी होती. राकेश झुनझुनवाला यांच्याकडे टायटनचे ३ कोटी ३० लाख १० हजार ३९५ शेअर्स आहेत. या शेअर्सचा दर सप्टेंबर महिन्यात १९२१.६० रुपये होता. तो आता २१४७.५० रुपये इतका झाला आहे. म्हणजेच प्रत्येक शेअर्समध्ये २२५.९ रुपयांची वाढ झाली आहे. यातून राकेश झुनझुनवाला यांना तब्बल ७४५ कोटी रुपयांची कमाई झाली. तर टाटा मोटर्सच्या शेअर्समधून १६२.१३ कोटी रुपयांची कमाई झाली आहे. या दोन्हीतून एकूण ९०७ कोटींपेक्षा जास्त कमाई त्यांना महिन्याभरात झाली.

loading image
go to top