Share Market: हजार अंशांनी घसरला सेन्सेक्स; सात महिन्यांतील मोठी घसरण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Share Market

Share Market: हजार अंशांनी घसरला सेन्सेक्स; सात महिन्यांतील मोठी घसरण

मुंबई: आज आठवड्याच्या सुरुवातीलाच म्हणजे सोमवारी शेअर मार्केटची सुरुवात खराब झाली आहे. बीएसईचा सेन्सेक्स 287.16 च्या अंशांनी म्हणजेच 0.48 टक्क्यांच्या घसरणीसह 59,348.85 च्या स्तरावर उघडला. दुसरीकडे निफ्टी देखील घसरणीसह उघडला. दोन्हीही इंडेक्स लाल निशाण्यावर उघडल्यानंतर आज दिवसभरात देखील शेअर मार्केटमध्ये बरीच घसरण झालेली पहायला मिळाली. दिवसभराच्या चढउतारानंतर सेन्सेक्स आज 1170.12 अंशांनी म्हणजेच 1.96 टक्क्यांनी घसरला आहे. दुपारी बारा वाजल्यानंतरच सेन्सेक्समध्ये 890.65 अंशांची घसरण झाली होती.

निफ्टी देखील कोसळला

लाल निशाण्यावर सुरु झालेल्या मार्केटमध्ये आज निफ्टीमध्येही घसरण झाली आहे. निफ्टीमधअये आज 348.25 अंशांची घसरण झाली आहे. म्हणजेच तब्बल 1.96 टक्क्यांची ही घसरण आहे. सध्या निफ्टी 17416.55 स्तरावर आहे. आज निफ्टी देखील मार्केटच्या सुरुवातीलाच कोसळलेला दिसून आला. सुरुवातीलाच 87.35 अंश वा 0.49 टक्क्यांनी घसरला होता.

गुरुवारी देखील घसरणीनेच बंद झाले मार्केट

गेल्या गुरुवारी देखील शेअर मार्केट घसरणीसह बंद झाले होते. गुरुवारी सेन्सेक्स 372.32 अंशांनी घसरुन 59,636.01 स्तरावर तर निफ्टी 133.85 अशांनी घसरुन 17,764.80 च्या स्तरावर बंद झाला होता.

loading image
go to top