esakal | Share Market : शेअर बाजारात परतली तेजी 
sakal

बोलून बातमी शोधा

sharemarket

मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स 416 अंशांची वाढ होऊन 31 हजार 743 अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 128 अंशांनी वधारून 9 हजार 282 अंशांवर स्थिरावला.

Share Market : शेअर बाजारात परतली तेजी 

sakal_logo
By
पीटीआय

मुंबई - म्युच्युअल फंड उद्योगाला उभारी देण्यासाठी रिझर्व्ह बॅंकेने (आरबीआय) जाहीर केलेल्या "लिक्विडीटी बूस्टर'ने गुंतवणूकदारांमध्ये सोमवारी उत्साह संचारला. यामुळे मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स 416 अंशांची वाढ होऊन 31 हजार 743 अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 128 अंशांनी वधारून 9 हजार 282 अंशांवर स्थिरावला. 

आणखी बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

देशांतर्गत पातळीवर "आरबीआय'ने जाहीर केलेले आर्थिक तरलता पॅकेज आणि जपानच्या मध्यवर्ती बॅंकेने तेथील अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी दिलेले पॅकेज यामुळे आशियाई शेअर बाजार आज वधारले. देशांतर्गत शेअर बाजारात गुंतवणूकदारांनी केलेल्या चौफेर खरेदीमुळे दोन्ही निर्देशांक तेजीसह बंद झाले. क्षेत्रीय पातळी बॅंकिंग, वित्तीय सेवा आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांच्या समभागात सर्वाधिक वाढ नोंदविण्यात आली. सेन्सेक्‍सच्या मंचावर आज इंड्‌सइंड बॅंक, ऍक्‍सिस बॅंक, कोटक बॅंक, आयसीआयसीआय बॅंक, बजाज फायनान्स आणि नेस्लेचे समभाग सर्वाधिक तेजीत होते तर एनटीपीसी, महिंद्रा अँड महिंद्रा, एचडीएफसी बॅंक, एअरटेल आणि आयटीसीच्या समभागामध्ये घसरण झाली. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

खनिज तेलाची घसरण कायम 
आंतरराष्ट्रीय पातळीवर मागणी आणि पुरवठ्याचे संतुलन बिघडल्याने खनिज तेलाच्या भावातील घसरण सोमवारी कायम राहिली. भारतीय कमॉडिटी बाजारात खनिज तेल तब्बल 20 टक्के घसरणीसह बंद झाले. 

रुपया वधारला 
चलन बाजारात आज डॉलरच्या तुलनेत रुपया वधारला. रुपया 26 पैशांनी वाढून 76.24 या पातळीवर बंद झाला.