esakal | Share Market: सेन्सेक्सची मुसंडी! पहिल्यांदाच पार केला 61 हजारांचा टप्पा
sakal

बोलून बातमी शोधा

सेन्सेक्सची मुसंडी! पहिल्यांदाच पार केला 61 हजारांचा टप्पा

सेन्सेक्सची मुसंडी! पहिल्यांदाच पार केला 61 हजारांचा टप्पा

sakal_logo
By
टीम ई सकाळ

मुंबई : सेन्सेक्सने आज जोरदार मुसंडी मारली आहे. आज आठवड्याच्या चौथ्या दिवशी म्हणजेच गुरुवारी मार्केट ओपन होतानाच मोठी तेजी पहायला मिळाली आहे. सध्या 307 अंशांनी सेन्सेक्स वधारला असून सध्या सेन्सेक्स 61,044.15 च्या स्तरावर असलेला पहायला मिळतो आहे. तर दुसरीकडे निफ्टीदेखील 18,261.15 वर असून तेजीत आहे. काल बुधवारी देखील शेअर मार्केटमध्ये मोठी तेजी पहायला मिळाली होती. सेन्सेक्स सध्या रेकॉर्ड स्तरावर आहे.

हेही वाचा: Share Market मध्ये आजही तेजी कायम; कोणत्या शेअर्सवर नजर ठेवाल?

काल बुधवारी असं होतं चित्र

शेअर मार्केटमध्ये काल बुधवारी पुन्हा जबरदस्त तेजी दिसून आली होती. निफ्टी 18150 च्या पलीकडे गेला होता. निफ्टी आणि सेन्सेक्समध्येही मजबूत तेजी दिसून आली होती. मिडकॅपमध्ये सर्वाधिक म्हणजे सुमारे 1.5 टक्के वाढ झाली होती. आजच्या व्यापारात ऑटो, मेटल आणि एनर्जी स्टॉक्समध्ये सर्वाधिक तेजी दिसून आली होती. सर्व क्षेत्रीय निर्देशांक आज हिरव्या रंगात अर्थात वाढीसह बंद झाले होते. निफ्टी ऑटो निर्देशांक (Nifty Auto Index) 3 टक्क्यांहून अधिक वाढला होता. त्याचप्रमाणे ऊर्जा, इन्फ्रा, आयटी आणि धातू निर्देशांक (Metal Index) सुमारे 1 टक्क्यांनी वाढले होते.

बुधवारचा दिवस संपल्यावर सेन्सेक्स 452.74 अंक अर्थात 0.75 टक्क्यांच्या वाढीसह 60,737.05 वर बंद झाला होता. तर निफ्टी 169.80 अर्थात 0.94 टक्क्यांच्या मजबूती वाढीसह 18,161.75 वर बंद झाला होता.

loading image
go to top