आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजार कोसळला

Share Market
Share Marketsakal media
Updated on
Summary

बाजार उघडल्यानंतर एका मिनिटात बाजार भांडवल हे ५.५३ लाख कोटी रुपयांनी कमी झाले.

आठवड्याच्या सुरुवातीलाच शेअर बाजारात (Share Market) मोठी घसरण झाली. सेन्सेक्समध्ये (Sensex) ११०० अंकांची घसरण झाली असून निर्देशांक ५५ हजार ९०७ अंकांवर पोहोचला आहे. बाजार उघडताच ४९४ अंकांनी घसरला होता. त्यानंतर निर्देशांक ५६ हजार १०४ अंक इतका होता. शेअर बाजार उघडल्यानंतर एका मिनिटात बाजार भांडवल हे ५.५३ लाख कोटी रुपयांनी कमी झाले. शुक्रवारी बाजार भांडवल हे २५९.४७ लाख कोटी इतके होते ते सोमवारी सकाळी बाजार उघडताच २५३.९४ लाख कोटींवर आले.

सेन्सेक्सप्रमाणे निफ्टीतही (Nifty) घसरण झाली. निफ्टीत जवळपास दोन टक्क्यांची म्हणजेच ३२५ अंकांची घसरण झाल्याचं दिसून आलं. सध्या निफ्टी १६ हजार ९६० अंशांवर आहे. निफ्टीत सिप्ला सर्वात मोठी कंपनी ठरली असून जवळपास २.१७ टक्क्यांनी शेअर्स वधारले आहेत.

सेन्सेक्समध्ये ३० फक्त सन फार्मा आघाडीवर होते तर इतर २९ शेअर्समध्ये मोठी घसरण दिसून आली. यात टाटा स्टील ३ टक्क्यांपेक्षा जास्त घसरला. तर एसबीआय़, एचडीएफसी, IndusInd Bank, Bajaj Finserve, महिंद्रा अँड महिंद्रा, अल्ट्राटेक, एक्सिस बँक, बजाज फायनान्स, एअरटेल, टेक महिंद्रा यांच्याही शेअर्समध्ये घसरण झाली.

Share Market
नवा आठवडा, नवा दिवस कसा असेल शेअर बाजारासाठी?

परदेशी गुंतवणूकदारांकडून केली जाणारी विक्री आणि बँकेच्या व्याजदरातील वाढ यामुळे बाजारात घसरण झाल्याचं तज्ज्ञांचे मत आहे. गेल्या ४० दिवसांमध्ये जवळपास ८० हजार कोटी रुपये परदेशी गुंतवणूकदारांनी काढून घेतले आहेत. तर बँक ऑफ इंग्लंडने व्याज दर ०.१५ टक्क्यांवरून ०.२५ टक्के केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com