शेअर बाजारातील तेजीला विराम

पीटीआय
शुक्रवार, 8 फेब्रुवारी 2019

मुंबई - रिझर्व्ह बॅंकेने रेपोदरात केलेल्या कपातीच्या पार्श्‍वभूमीवर शेअर बाजारात गुंतवणुकदारांनी आज मोठ्या प्रमाणात नफेखोरी केली. त्यामुळे गेल्या पाच सत्रांत वधारलेला मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स ४.१४ अंशांच्या किरकोळ घसरणीसह ३६ हजार ९७१ अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीत ६.९५ अंशांची घट होऊन तो ११ हजार ६९ अंशांवर स्थिरावला. 

दिवसाआरंभी सेन्सेक्‍सने २०० अंशांनी उसळी घेतली होती. मात्र रिझर्व्ह बॅंकेने रेपोदरात पाव टक्का कपात केल्याच्या वृत्ताने अखेर त्यात घसरण झाली. सन फार्माचा शेअर आज ४.४८ टक्‍क्‍यांनी वधारला. त्यापाठोपाठ बजाज ऑटो, टाटा मोटर्स, कोल इंडिया, हिरो मोटोकॉर्प, मारुती आणि एचसीएलचे शेअर तेजीसह बंद झाले. रिलायन्स, पॉवर ग्रिड, एचडीएफसी, एल अँड टी, इंडसइंड बॅंक, बजाज फायनान्स आदी शेअरमध्ये घसरण झाली.

परकी संस्थात्मक गुंतवणुकदारांनी बुधवारी ६९४.९७ कोटींचे, तर स्थानिक संस्थात्मक गुंतवणुकदारांनी ५२५.२६ कोटींचे शेअर खरेदी केल्याची माहिती शेअर बाजाराकडून देण्यात आली.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Share market Stop