नोव्हेंबर महिन्याची उत्तम सुरुवात! आज कोणत्या शेअर्सवर नजर ठेवाल?

शेअर बाजारात नोव्हेंबरची सुरुवात चांगली झाली आहे.
Share Market
Share Marketsakal
Summary

सोमवारच्या व्यवहारात, बेंचमार्क निर्देशांक 1 टक्क्यांहून अधिक वाढले आहेत, गेल्या आठवड्यातील 2.5 टक्क्यांच्या घसरणीवरून सावरले आहेत.

शेअर बाजारात नोव्हेंबरची सुरुवात चांगली झाली आहे. सोमवारच्या व्यवहारात, बेंचमार्क निर्देशांक 1 टक्क्यांहून अधिक वाढले आहेत, गेल्या आठवड्यातील 2.5 टक्क्यांच्या घसरणीवरून सावरले आहेत. बीएसई सेन्सेक्सने पुन्हा एकदा 60,000 ची पातळी ओलांडली आहे. 1.4 टक्क्यांनी वधारून सोमवारी 60,138.46 वर बंद झाला. त्याच वेळी, निफ्टीने पुन्हा एकदा 17900 ची पातळी ओलांडली आहे आणि 1.5 टक्क्यांनी वाढ होत 17,929.65 वर पोहोचला आहे.

तांत्रिक दृष्टीकोन

निफ्टी 50 ने टेक्निकल चार्टवर एक बुलिश कँडल बनवले आहे, जी तेजीचे संकेत देते. निफ्टीने 18000 ची पातळी ओलांडल्यास त्यात आणखी वाढ होऊ शकते असे बाजारातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

Share Market
Share Market 'या' शेअर्सकडून एका वर्षात 210 टक्के परतावा

चांगली जागतिक चिन्हे

बहुतांश ग्लोबल इंडेक्स चीनमधील ऑक्‍टोबर महिन्‍याच्‍या संमिश्र मॅन्युफॅक्चरिंगच्या आकड्यांच्या आसपासच तेजीने व्यवहार करताना दिसून आले. फ्रान्सचेCAC, जर्मनीचे DAX आणि ब्रिटनचे FTSE निर्देशांक 0.4 टक्क्यांपासून 0.9 टक्क्यांनी वधारले आहेत. आशियातील निक्केई आणि कोस्पी देखील हिरव्या रंगात अर्थात तेजीत राहिले. मात्र, चीनचा मॅन्युफॅक्चरिंग डेटा आल्यानंतर शांघाय कंपोझिटवर दबाव आला. ऑक्टोबरमध्ये चीनमधील पीएमआय निर्देशांक सलग दुसऱ्या महिन्यात 50 च्या खाली राहिला. ऑक्टोबरमध्ये तो 49.2 होता, तर सप्टेंबरमध्ये तो 49.6 होता.

बाजार ओव्हरसोल्ड दिसत असल्याने, त्यात पुन्हा तेजी दिसून येते आहे, पण व्यापाऱ्यांनी त्यांच्या सेटअपवर नियंत्रण ठेवावे आणि सावधपणे मार्केटमध्ये पैसे गुंतवावे असे एंजेल वनचे समीत चव्हाण म्हणाले. निफ्टीसाठी 18000-18100 स्तरांवर तात्काळ अडथळा दिसून येतो आहे.

Share Market
नवा महिना, नवा दिवस कसा असेल शेअर बाजारासाठी?

आज कोणत्या शेअर्सवर नजर ठेवाल?

- इंडसइंड बँक (INDUSINBANK)

- हिन्डाल्को (HINDALCO)

- भारती एअरटेल (BHARTIARTL)

- एचसीएल टेक (HCLTECH)

- ग्रासिम (GRASIM)

- आयडिया (IDEA)

- सन टीव्ही (SUNTV)

- महिन्द्रा अँड महिन्द्रा फायनान्स (M&MFIN)

- गोदरेज प्रॉपर्टीज (GODREJPROP)

- माईंड ट्री (MINDTREE)

नोंद : क्रिप्टो मार्केट,शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्यप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो,शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com