Share Market: शेअर बाजार सकारात्मक, सेन्सेक्स किंचित वाढला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

share market

Share Market: शेअर बाजार सकारात्मक, सेन्सेक्स किंचित वाढला

मंगळवारी सुरुवातीच्या सत्रात पडलेला बाजार दिवसअखेरी सावरला होता. आज तेच वातावरण दिसत असून सेन्सेक्स 100 अंकांनी वधारला आहे. निफ्टी 25 अंकांनी वाढून 17,372 वर ट्रेंड करत आहे. दरम्यान, शेअर बाजारात सकारात्मकता दिसत असून सेन्सेक्स किंचितसा वाढला आहे. त्यामुळे शेअर बाजारात आज चांगल्या गतीने व्यवसाय सुरू झाला असून शेअर बाजारात उत्साह दिसून येत आहे.

सेन्सेक्स आज 100 पेक्षा जास्त अंक उघडण्यात यशस्वी झाला आहे आणि निफ्टी 17300 च्या वर व्यापार उघडला आहे. NSE चा निफ्टी आज 37.45 अंकांच्या वाढीसह 17,349.25 वर उघडला आणि काल तो 17,311.80 स्तरावर बंद झाला होता. दुसरीकडे, बीएसईचा 30 शेअर्सचा निर्देशांक सेन्सेक्स 107.11 अंकांच्या वाढीसह 58,174.11 वर उघडण्यात यशस्वी झाला आहे. कालच्या व्यवहारात तो 58,067 च्या पातळीवर बंद झाला होता.

हेही वाचा: Gold price : सोन्याच्या दरांत १ ते १०० रुपयांची वाढ

आज सकाळी साडेनऊच्या सुमारास निफ्टी 17, 329 च्या पातळीवर व्यवहार करत होता आणि त्याच्या 50 पैकी 22 समभागांमध्ये गतीने व्यवहार होताना दिसत आहेत. दरम्यान, त्याचवेळी 28 समभाग घसरतानाचे चित्र आहे. याप्रमाणे निफ्टीसंदर्भात बोलायचे झाले तर तो 23 अंकांच्या म्हणजेच 0.33 टक्क्यांच्या घसरणीसह 37900 च्या पातळीवर व्यवहार करत होता. आज आयटी, मेटल, फार्मा, हेल्थकेअर निर्देशांक हिरव्या चिन्हासह व्यवहार करताना दिसत आहेत.

दरम्यान, लाल चिन्हाच्या क्षेत्रांवर नजर टाकली तर ऑटो समभागांमध्ये 0.80 टक्क्यांची घसरण दिसून येत आहे. एफएमसीजी समभाग 0.45 टक्क्यांच्या आसपास आणि तेल आणि वायूचे समभागही 0.3 टक्क्यांच्या आसपास व्यवहार करत आहेत. आज निफ्टीच्या घसरलेल्या समभागांवर नजर टाकली तर कोल इंडिया 2.16 टक्के, M&M 1.39 टक्के आणि टाटा मोटर्स 1.39 टक्क्यांनी घसरत आहे. याशिवाय कोटक महिंद्रा बँक 1.38 टक्के आणि ITC 1.11 टक्के घसरणीवर कायम आहे. इतर समभागांवर नजर टाकल्यास, एनटीपीसी, ओएनजीसी, हिंदाल्को आणि नेस्ले यांच्यासह अनेक समभाग घसरणीसह व्यवहार करत आहेत.

हेही वाचा: बाजार सुरु होण्याआधी जाणून घ्या आज कोणते 10 शेअर्स करतील परफॉर्म ?

Web Title: Share Market Update 3 August Market Positively Start Sensex Increased Slightly

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..