
Share Market: शेअर बाजार गडगडला; सेन्सेक्स 566 तर निफ्टी 149 अंकांनी घसरला
Share Market Updates:शेअर बाजारात गेल्या काही दिवसापासून सुरु असलेल्या तेजीला ब्रेक लागला आहे. आज सलग दुसऱ्या दिवशीही शेअर बाजारात घसरण झाली. विकली एक्सपायरीच्या आदल्या दिवशी शेअर बाजारात मोठी घसरण झाली. सेन्सेक्स 566.09 अर्थात 0.94 टक्क्यांनी घसरून 59610.41वर बंद झाला, तर निफ्टीमध्येही 149.75 अर्थात 0.83 टक्क्यांची घसरण होऊन 17,807.65 बंद झाला.
हेही वाचा: Share market: शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स 360 तर निफ्टी 115 अंकांनी घसरला
तत्पूर्वी आज विकली एक्सपायरीच्या आदल्या दिवशी शेअर बाजाराची सुरुवात घसरणीने झाली. शेअर बाजाराच्या दोन्ही निर्देशांकात आजच्या दिवसाच्या सुरुवातीला घसरण झाली. सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही निर्देशांकांनी आज गॅप डाऊन ओपनिंग दिलं. सेन्सेक्स 360.79 अंकांच्या घसरणीसह 59815.71वर सुरु झाला. तर निफ्टीही 115 अंकांच्या घसरणीसह 17842.75 वर सुरु झाला.
Web Title: Share Market Updates Closing 6th April 2022
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..