Share Market Wrap : शेअर बाजारात पडझड; सेन्सेक्स, निफ्टीत 2 टक्क्यांनी घसरण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Share Market Latest Updates

Share Market Wrap : शेअर बाजारात पडझड; सेन्सेक्स, निफ्टीत 2 टक्क्यांनी घसरण

मुंबई : भारतीय शेअर बाजारात तो बंद होताना मोठी पडझड झाली. सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये सुमारे २ टक्क्यांनी घसरण नोंदवली गेली आहे. गुंतवणुकदारांनी पुढील आठवड्यात यूएस फेडने दर वाढीसाठी जोरदार प्रयत्न केल्यानं ही स्थिती निर्माण झाल्याचं सांगितलं जात आहे. (Share Market wrap Fall in stock market Sensex Nifty fall at 2 percent)

हेही वाचा: Video : चीनमध्ये गगनचुंबी इमारतीला भीषण आग; जवळपास सर्व मजले आगीच्या भक्षस्थानी

सर्वत्र 75bps ची मोठी वाढ अपेक्षित असताना काही विश्लेषकांनी 21 सप्टेंबर रोजी 100bps वाढीचा अंदाज वर्तवला आहे. अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेत आधीच तणावाची चिन्हे दिसत आहेत, त्यामुळं पुढील काळात स्थिती अर्थव्यवस्थेसाठी आणि शेअर बाजारासाठी अधिक त्रासदायक ठरण्याची चिन्हं आहेत.

हेही वाचा: Uniform Dress Code : "तर नागा साधू कॉलेजात प्रवेश घेतील"; SCनं फेटाळली याचिका

दरम्यान, भारतीय शेअर बाजारात दिवसभरात सेन्सेक्स 348 अंकांनी घसरून 59,585.72 वर उघडला तर 1,247 अंकांनी घसरून 58,687.17 या इंट्राडे नीचांकी पातळीवर पोहोचला. नंतर निर्देशांक 1,093 अंक किंवा 1.82 टक्क्यांच्या घसरणीसह 58,840.79 वर बंद झाला. तसेच निफ्टी 50 347 अंकांनी म्हणजेच 1.94 टक्क्क्यांच्या घसरणीसह 17,530.85 वर बंद झाला. BSE मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांक देखील किमान कामगिरी करत आहेत, ते देखील अनुक्रमे 2.85 टक्के आणि 2.38 टक्क्यांनी घसरले.

IMFचे जागतीक मंदीचे संकेत

महागाई आणि आर्थिक मंदीच्या चिंतेनं प्रमुख बाजारांची स्थिती कमकुवत होती. जागतिक बँकेच्या मुख्य अर्थशास्त्रज्ञांनी गुरुवारी सांगितले की, "ते जागतीक अर्थव्यवस्थेतील कमी वाढ आणि उच्च चलनवाढीच्या कालावधीबद्दल चिंतित आहेत" तर आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं म्हटलंय की, "जागतीक अर्थव्यवस्थेवर नकारात्मक जोखमीचं वर्चस्व कायम आहे. परंतू हे सांगणं घाईचं ठरेल की, एक व्यापक जागतीक मंदी येऊ शकेल," रॉयटर्सनं याबाबत वृत्त दिलं आहे.

Web Title: Share Market Wrap Fall In Stock Market Sensex Nifty Fall At 2 Percent

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..