शेअर्स घ्यायचा विचार करताय ? मिडकॅपसाठी 6 दमदार स्टॉक

शेअर्स घ्यायचा विचार करताय ? मिडकॅपसाठी 6 दमदार स्टॉक

Best Midcap Stocks: सततच्या तेजीनंतर, मिडकॅप सेक्टरमध्ये गेल्या काही सत्रांमध्ये घसरण दिसून आली. मात्र, हीच बाब गुंतवणुकीसाठी योग्य मानली जात आहे. असो, रिटेल गुंतवणूकदारांमध्ये मिडकॅपला कायमच पसंती असते. याचे कारण असे आहे की यामध्ये गुंतवणुकीचे एकापेक्षा जास्त पर्याय आहेत. बाजारात अनेक मिडकॅप शेअर्स आहेत, जे मोठी झेप घेऊ शकतात. तुम्हीही काही चांगले स्टॉक्स शोधत असाल, तर आजची यादी तयार आहे. आज, या शेअर्सच्या यादीमध्ये लेमन ट्री हॉटेल्स (Lemon Tree Hotels), अपोलो ट्रायकोट (Apollo Tricoat), युनियन बँक (Union Bank), टीव्हीएस श्रीचक्रा (TVS Srichakra), जिंदाल सॉ (Jindal Saw) आणि एसपीएआरसी (SPARC) यांचा समावेश आहे. शेअर बाजार तज्ज्ञांनी या शेअर्सना ग्रीन सिग्नल दिला आहे.

शेअर बाजार तज्ज्ञ विकास सेठी यांची निवड

लॉन्ग टर्म: गॅब्रिएल इंडिया (Gabriel India)
विकास सेठी यांनी लॉन्ग टर्मसाठी गॅब्रिएल इंडियामध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. यासाठी 225 रुपयांचे टारगेट ठेवण्यात आले आहे. ही एक ऑटो कंपोनेंट कंपनी आहे जी शॉकर्स तयार करते. कंपनी आता ईव्ही कंपोनंट्सवर लक्ष केंद्रित करत आहे. या कंपनीवर कोणतेही कर्ज नाही. या कंपनीत एफआयआयनेही गुंतवणूक केली आहे.

पोझिशनल : लॉरस लॅब्स (Laurus Labs)
विकास सेठी यांनी लॉरस लॅबची पोझिशनल पिक म्हणून निवड केली आहे. याच्या शेअरसाठी 580 रुपयांचे टारगेट देण्यात आले आहे. तर 525 रुपयांवर स्टॉप लॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. मजबूत फंडामेंटल्स असलेला हा फार्मा स्टॉक आहे.

शॉर्ट टर्म: फिनोलेक्स इंडस्ट्रीज (Finolex Industries)
राजेश पालविया यांनी फिनोलेक्स इंडस्ट्रीजमध्ये शॉर्ट टर्मसाठी गुंतवणुकीचा सल्ला दिला आहे. या स्टॉकसाठी, त्यांनी 260 रुपयांचे टारगेट दिले आहे, तर 215 रुपयांवर स्टॉप लॉस लावण्याचा सल्ला दिला आहे.

शॉर्ट टर्म: कंट्रोल प्रिंट लि. (Control Print Ltd)
शॉर्ट टर्मसाठी, विकास सेठी यांनी कंट्रोल प्रिंट लि. मध्ये गुंतवणूकीचा सल्ला दिला आहे. या स्टॉकसाठी, त्यांनी 330 ते 335 रुपयांचे टारगेट दिले आहे. तर 310 रुपयांवर स्टॉप लॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. ही कंपनी मार्किंग इक्विपमेंट्स तयार करते, जी बारकोडिंगमध्ये वापरली जातात.

पोझिशनल: अॅस्ट्रा मायक्रो (Astra Micro)
राजेश पालविया यांनी एस्ट्रा मायक्रोची पोझिशनल पिक म्हणून निवड केली आहे. या स्टॉकसाठी, त्यांनी 250 ते 260 रुपयांचे टारगेट दिले आहे. तर 178 रुपयांवर स्टॉप लॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. हा स्टॉक आधीच ब्रेकआउट झालाआहे. सध्या सर्व महत्त्वाच्या मूव्हिंग एव्हरेजच्यावर व्यापार करत आहे.

शॉर्ट टर्म: फिनोलेक्स इंडस्ट्रीज (Finolex Industries)
राजेश पालविया यांनी फिनोलेक्स इंडस्ट्रीजमध्ये शॉर्ट टर्मसाठी गुंतवणुकीचा सल्ला दिला आहे. या स्टॉकसाठी, त्यांनी 260 रुपयांचे टारगेट दिले आहे, तर 215 रुपयांवर स्टॉप लॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. गेल्या 3 आठवड्यांच्या सुधारणांनंतर, आता शेअर पॉझिटिव्ह झोनमध्ये ट्रेड करत आहे.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्यप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com