पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे IOC, HPCL, ONGC शेअर्स करतील मालामाल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

share market

अनेक ब्रोकरेज कंपन्या ऑइल मार्केटिंग कंपन्यांच्या शेअर्सबाबतीत सकारात्मक आहेत.

पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे IOC, HPCL, ONGC शेअर्स करतील मालामाल

तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या (Petrol and Diesel) किंमतीत वाढ केली आहे. गेल्या दोन दिवसांत तेल कंपन्यांनी (OMCs) पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 80-80 पैशांनी वाढ केली आहे. म्हणजेच गेल्या दोन दिवसांत तेलाच्या किमतीत 1 रुपया 60 पैशांनी वाढ झाली आहे. अशा परिस्थितीत अनेक ब्रोकरेज कंपन्या ऑइल मार्केटिंग कंपन्यांच्या शेअर्सबाबतीत (Shares) सकारात्मक आहेत आणि या शेअर्समध्ये खरेदी करण्याचा सल्ला देत आहेत. आयओसी, एचपीसीएल, ओएनजीसी आणि रिलायन्स इंडस्ट्रीज (IOC, HPCL, ONGC, RELIANCE INDUSTRIES) सारख्या शेअर्सवर अनेक ब्रोकरेज कंपन्यांनी गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे.

हेही वाचा: Paytm शेअर्स विकत घेण्याचा तज्ञांचा सल्ला; जाणून घ्या अश्नीर ग्रोव्हर यांचं मत

इंडियन ऑईल (Indian Oil)

टारगेट (Target) - 160 रुपये

ओएनजीसी (ONGC)

टारगेट (Target) - 185 रुपये

एचपीसीएल (HPCL)

टारगेट (Target) - 310 रुपये

रिलायन्स इंडस्ट्रीज (Reliance Ind)

टारगेट (Target) - 2850 रुपये

हेही वाचा: आज शेअर बाजारात काय स्थिती असेल? टॉप 10 शेअर्स कोणते ?

अखेर कंपन्यांनी तेलाच्या किंमती वाढवण्यास सुरुवात केल्याचे ब्रोकरेज कंपनी सिटीचे (CITI) म्हणणे आहे. हे पाऊल तेल कंपन्यांसाठी अतिशय सकारात्मक ठरू शकते, असा विश्वास कंपनीने व्यक्त केला आहे. याशिवाय, एलपीजी सिलिंडरच्या किमतीत 50 रुपयांची वाढ झाल्याचाही सकारात्मक परिणाम होईल, असे मॉर्गन स्टॅन्लेच्या (Morgan Stanley) म्हणणे आहे.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

Web Title: Shares Like Ioc Hpcl Ongc Will Give Good Earnings Due To Rising Prices Of Petrol And Diesel

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top