10 दिवसांपूर्वी शेअर्स लिस्ट, एवढ्यातच 162% नफा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

shares

10 दिवसांपूर्वी शेअर्स लिस्ट, एवढ्यातच 162% नफा...

मुंबई : फँटम डिजिटल इफेक्ट्स (Phantom Digital Effects) या आघाडीच्या व्हीएफएक्स (VFX) सेवा देणाऱ्या कंपनीचे शेअर्स गेल्या महिन्यातच देशांतर्गत बाजारात लिस्ट झाले. त्याचे शेअर्स 21 ऑक्टोबर रोजी एनएसई एसएमईवर लिस्ट झाले होते.

अशातच या कंपनीने त्यांच्या आयपीओ गुंतवणूकदारांना जोरदार परतावा दिला आहे. त्याचे शेअर्स आयपीओ गुंतवणूकदारांना 95 रुपयांच्या किंमतीला जारी करण्यात आले होते आता ते 249.10 रुपयांवर ट्रेड करत आहेत. याचा अर्थ आयपीओवेळी ज्या गुंतवणूकदारांनी यात पैसे गुंतवले त्यांच्या भांडवलात 162 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

फँटम डिजिटल इफेक्ट्सचे शेअर्स 91 रुपयांवर लिस्ट झाले होते, म्हणजेच गुंतवणूकदारांना 216 टक्के लिस्टिंग फायदा झाला. प्रॉफिट-बुकिंगमुळे किमतीत काहीशी मंदी आली आहे पण तरीही आयपीओ गुंतवणूकदार सुमारे 162 टक्क्यांच्या नफ्यात आहेत.

फँटम डिजिटल इफेक्ट्सचा आयपीओ गेल्या महिन्यात 12 ऑक्टोबर ते 14 ऑक्टोबर दरम्यान खुला झाला होता. 29.10 कोटी रुपयांचा हा आयपीओ164 वेळा सबस्क्राइब झाला. या आयपीओला सर्वात मोठा प्रतिसाद गैर-संस्थात्मक गुंतवणूकदारांचा होता आणि त्यांच्यासाठी राखीव असलेला हिस्सा 555 वेळा सब्सक्राइब झाला.

फँटम डिजिटल इफेक्ट्स ही ट्रस्टेड पार्टनर नेटवर्क (TPN) कंपनी आहे. त्याचा भारतात क्रिएटिव्ह VFX स्टुडिओ आणि यूएस आणि कॅनडामध्ये ऑफिसेज आहेत. ही कंपनी VFX शी संबंधित सेवा पुरवते. तुम्ही मोठ्या बजेटच्या चित्रपटांमध्ये VFX चा वापर पाहिला असेल, फँटम डिजिटल अशाच पद्धतीची सेवा देते.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

टॅग्स :Share MarketStock Market