Go Fashion: गो फॅशनच्या शेअर्सने गाठला नवा उच्चांक, तुमच्याकडे आहेत का हे शेअर्स? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Share Market

Go Fashion: गो फॅशनच्या शेअर्सने गाठला नवा उच्चांक, तुमच्याकडे आहेत का हे शेअर्स?

गो फॅशनच्या (Go Fashion) शेअर्सनी गुरुवारी त्यांच्या नव्या ऑल टाईम हायला स्पर्श केला. कंपनीचा शेअर एनएसईवर 5 टक्क्यांहून अधिक वाढ करत 1,374.60 रुपयांवर पोहोचला. गो फॅशनचे शेअर्स आता त्याच्या आयपीओच्या किमतीच्या जवळपास 100 टक्क्यांनी जास्त भावाने व्यवहार करत आहेत. शेअर बाजारात कमजोरी असताना गो फॅशनच्या शेअर्समध्ये तेजी येत असल्याने ही वाढ जास्त महत्त्वाची आहे. गेल्या एका महिन्यात बीएसई सेन्सेक्स सुमारे 5 टक्क्यांनी घसरला आहे. गो फॅशनच्या शेअर्समध्ये याच कालावधीत 15 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे.

हेही वाचा: Share Market: शेअर बाजारात पडझडीचं सत्र सुरूच; सेन्सेक्स 509 घसरला

गो फॅशनचा स्टॉक गेल्या वर्षी 30 नोव्हेंबरला लिस्ट झाला होता. कंपनीच्या आयपीओला गुंतवणूकदारांकडून दमदार प्रतिसाद मिळाला आणि सुमारे 135.46 पटीने हा शेअर सबस्क्राईब झाला. गुंतवणूकदारांच्या चांगल्या प्रतिसादामुळे कंपनीची लिस्टिंग मजबूत झाली आणि इश्यूच्या सुमारे 90 टक्के प्रीमियमवर शेअर लिस्ट झाला. गो फॅशनची इश्यू प्राइस 690 रुपये प्रति शेअर निश्चित करण्यात आली होती, तर त्याचे शेअर्स बीएसईवर 1316 रुपये आणि एनएसईवर 1310 रुपये लिस्ट झाले होते. गो फॅशनची आयपीओ साईज 1014 कोटी रुपये होती. यापैकी 125 कोटी रुपयांचे फ्रेश इश्यू आणि 888.61 कोटी रुपयांचा ऑफर फॉर सेल जारी करण्यात आला होता

हेही वाचा: Share Market: शेअर बाजारात तेजीनंतर घसरण, सेन्सेक्स 188 अंकांनी घसरला

गो फॅशन ही महिलांच्या बॉटम-वेअर इंडस्ट्रीतील अग्रगण्य कंपन्यांपैकी एक आहे. ते 'गो कलर्स' या ब्रँड नावाने आपली उत्पादने विकते. कंपनीकडे संपूर्ण भारतातील मल्टी-चॅनेल डिस्ट्रीब्यूशन नेटवर्क आहे. त्यामुळेच देशांतर्गत ब्रोकरेज आयसीआयसीआय सिक्युरिटीजने ऑगस्टमधील एका अहवालात बाय रेटिंग कायम ठेवताना 'गो फॅशन'च्या स्टॉकसाठी 1,450 रुपयांचे टारगेट ठेवले होते. हे टारगेट कंपनीच्या सध्याच्या बाजारभावापेक्षा 10.33 टक्क्यांनी जास्त आहे.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.