झी-सोनी विलिनीकरण: गुंतवणुकदारांनी शेअर्स होल्ड करावे की विक्री करावी?

ZEE च्या शेअर्सची सुरुवात गुरुवारी तेजीने झाली.
ZEE and Sony
ZEE and Sonyesakal
Summary

ZEE च्या शेअर्सची सुरुवात गुरुवारी तेजीने झाली.

झी एंटरटेन्मेंट एंटरप्रायझेस लिमिटेडचे (ZEEL) शेअर्स गुरुवारी चांगलेच वाढले. बुधवारी ZEE मीडिया ग्रुपने सोनीच्या भारतीय युनिट, सोनी पिक्चर्स नेटवर्क्स इंडियामध्ये (Sony Pictures Networks India) त्यांचे टेलिव्हिजन चॅनेल, चित्रपट मालमत्ता आणि स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म विलीन करण्याच्या कराराला अंतिम स्वरूप दिले. त्यामुळे आता हे दोघेही भारतात आता नेटफ्लिक्स (Netflix) आणि डिझनेसारख्या (Disney) OTT प्लॅटफॉर्मशी स्पर्धा करण्यासाठी एकत्र आलेत.

ZEE and Sony
आज कोणते शेअर्स चांगला परतावा देतील? जाणून घ्या ट्रेडिंग स्ट्रॅटेजी

ZEE च्या शेअर्सची सुरुवात गुरुवारी तेजीने झाली. इंट्राडे दरम्यान, सुमारे 2 टक्क्यांनी उसळी घेतली. मात्र, नंतर शेअरने आपली आघाडी गमावली. दुपारी 1.30 च्या सुमारास, झीलचे (ZEEL)शेअर्स एनएसईवर 0.80 टक्क्यांनी कमी होऊन 345.95 रुपये प्रति शेअरवर व्यवहार करत होते. याआधी बुधवारी झीलचे (ZEEL) शेअर्स अर्धा टक्का वाढीसह बंद झाले होते.

बहुतेक ब्रोकरेजचा झी एंटरटेन्मेंट एंटरप्रायझेस लिमिटेडच्या (ZEEL) स्टॉकबद्दल चांगला दृष्टीकोन आहे. त्यांनी या शेअर्ससाठी 450 रुपयांपर्यंत टारगेट निश्चित केले आहे. जे की झीच्या सध्याच्या किंमतीपेक्षा 30 टक्के जास्त आहे.

ZEE and Sony
SPIC शेअर्स येत्या 3 महिन्यांत देणार 36 टक्के नफा!

ZEEL साठी विविध ब्रोकरेजने दिलेले टारगेट्स खालीलप्रमाणे

- सिटी (Citi) - 395 रुपये

- सीएलएसए (CLSA) - 415 रुपये

- मोतीलाल ओस्वाल (Motilal Oswal) - 425 रुपये

- एलारा (Elara) - 450 रुपये

1) सिटी (CITI)

इन्व्हेस्को आणि इतर आघाडीच्या संस्था विलीनीकरणावर कसे व्होट करतात यावर लक्ष ठेवण्याची गरज आहे असे सिटी (CITI) ब्रोकरेज हाऊसचे म्हणणे आहे.

ZEE and Sony
शेअर बाजारात पुन्हा तेजी! आज कोणते शेअर्स किती देणार परतावा

2) सीएलएसए (CLSA)

करार पूर्ण झाल्यानंतर या शेअर्सचे व्हॅल्युएशन विक्रमी उच्चांक पुन्हा गाठू शकते. असे सीएलएसए (CLSA) ब्रोकरेज हाऊसचे म्हणणे आहे.

3) मोतीलाल ओसवाल (Motilal Oswal)

सोनी सारख्या धोरणात्मक भागिदाराकडे भारतीय मीडिया क्षेत्रातील मोठ्या संधींचा फायदा घेण्याची क्षमता असेल असा विश्वास मोतीलाल ओस्वाल (Motilal Oswal) ब्रोकरेज हाऊसचे म्हणणे आहे.

4) लारा (Elara)

विलीनीकरणानंतर नव्या कंपनीची स्थापना होणार आहे, डिजिटल प्लॅटफॉर्मबाबत काय पावले उचलली जातील, याकडे सर्वांचे लक्ष असेल, असे ब्रोकरेजने सांगितले. झी-सोनी एकत्रित येऊनही अद्याप डिझनी हॉटस्टार (Disney Hotstar) च्या मागे आहे.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com