Shares | पेनी स्टॉकची कमाल, एका वर्षात गुंतणूकदार कोट्यधीश... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shares

Shares : पेनी स्टॉकची कमाल, एका वर्षात गुंतणूकदार कोट्यधीश...

मुंबई : कैसर कॉर्पोरेशन लि. (Kaiser Corporation Ltd) हा स्मॉल कॅप स्टॉक आहे, जो गेल्या वर्षीपर्यंत पेनी स्टॉकमध्ये गणला जात होता. पेनी स्टॉक हे असे शेअर्स असतात ज्यांची किंमत 10 रुपयांपेक्षा कमी असते. पण या शेअर्समध्ये गुंतवणूक करणे अत्यंत जोखमीचे असते.

पण जर तुम्ही चांगल्या पेनी स्टॉकमध्ये गुंतवणूक केली तर तर हेच पेनी स्टॉक तुम्हाहाला मोठी रक्कम मिळवून देतात. कैसर कॉर्पोरेशन हा असाच एक पेनी स्टॉक आहे ज्याने गेल्या एका वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 20,000 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे.

गेल्या वर्षभरात शेअर बाजारात बरीच अस्थिरता होती, पण या काळात हा शेअर कोणत्याही दबावाशिवाय आणि कंसोलिडेशनशिवाय वरच्या पातळीवर दिसला.

सोमवारी बीएसईवर कैसर कॉर्पोरेशन लिमिटेडचा शेअर 3.27% वाढून 80.50 रुपयांवर बंद झाला. पण, सुमारे एक वर्षापूर्वी, 22 सप्टेंबर 2021 रोजी, त्याच्या शेअर्सची किंमत बीएसईवर केवळ 39 पैसे होती.

अशाप्रकारे गेल्या वर्षभरात या शेअरची किंमत 20,541.03 टक्क्यांनी वाढली आहे. त्याच वेळी, वर्ष 2022 च्या सुरुवातीपासून, हा स्टॉक 2,656.85 टक्क्यांवर वाढला आहे, तर गेल्या एका महिन्यात सुमारे 13.86 टक्क्यांनी वाढला आहे.

याचा अर्थ असा की जर एखाद्या गुंतवणूकदाराने 1 वर्षापूर्वी स्टॉकमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते तर आज त्याचे 1 लाख रुपयांचे मूल्य जवळपास 206 पटीने वाढून 2.06 कोटी रुपये झाले असते आणि तो कोट्यधीश झाला असता.

दुसरीकडे, जर एखाद्या गुंतवणूकदाराने या वर्षाच्या सुरुवातीला म्हणजे 1 जानेवारी रोजी त्याच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते, तर त्याच्या गुंतवणुकीचे मूल्य आज 27.56 लाख रुपये झाले असते.

दुसरीकडे, जर एखाद्या गुंतवणूकदाराने 1 महिन्यापूर्वी कैसर कॉर्पोरेशनच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते, तर आज त्याची किंमत आज 14.86 लाख रुपये झाली असती.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

Web Title: Shares Peak Of Penny Stocks Billionaire Investors In One

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Share Market