esakal | Shares: मंगळवारी कोणत्या शेअर्सवर नजर ठेवाल?
sakal

बोलून बातमी शोधा

share
मंगळवारी कोणत्या शेअर्सवर नजर ठेवाल?

मंगळवारी कोणत्या शेअर्सवर नजर ठेवाल?

sakal_logo
By
सकाऴ वृत्तसेवा

- शिल्पा गुजर

सोमवारी BSE सेन्सेक्स 77 अंकांच्या वाढीसह विक्रमी 60,136 अंकांवर बंद झाला. एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक आणि आयटीसीच्या वाढीमुळे बाजाराला मजबूती मिळाली. तीस शेअर्सवर आधारित सेन्सेक्सने एका वेळी 60,476.13 च्या विक्रमी पातळीवर गाठली. सरतेशेवटी, 76.72 अंक किंवा 0.13 टक्के वाढीसह ते 60,135.78 वर बंद झाले. त्याचप्रमाणे, नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा निफ्टी (NSE Nifty) 50.75 अंकांनी अर्थात 0.28 टक्क्यांनी वाढून 17,945.95 वर बंद झाला.

सेन्सेक्सच्या शेअर्समध्ये मारुतीचा शेअर सर्वाधिक 4 टक्क्यांनी वाढला. याशिवाय पॉवर ग्रिड, आयटीसी, एनटीपीसी, एसबीआय, महिंद्रा अँड महिंद्रा, कोटक बँक आणि एचडीएफसी बँकेतही चांगली तेजी दिसली.

हेही वाचा: सणांच्या पार्श्वभूमीवर येणारा काळ चांगला, आज कोणत्या शेअर्सवर नजर ठेवाल?

टीसीएसला मोठा झटका

सोमवारी टीसीएसला सर्वाधिक 6 टक्के नुकसान सहन करावे लागले. कंपनीच्या दुसऱ्या तिमाहीचे निकाल बाजाराच्या अपेक्षेनुसार नसल्यामुळे हा स्टॉक खाली गेला. गेल्या आठवड्यात शुक्रवारी बाजार बंद झाल्यानंतर कंपनीने आर्थिक निकाल जाहीर केले होते. त्याचा एकत्रित निव्वळ नफा सप्टेंबर 2021 मध्ये संपलेल्या तिमाहीत 14.1 टक्क्यांनी वाढून 9,624 कोटी रुपये झाला. एम्के ग्लोबलच्या अहवालानुसार, टीसीएसच्या दुसऱ्या तिमाहीचे निकाल बाजाराच्या अपेक्षेनुसार नव्हते. कंपनीची करपूर्व कमाई आणि कमाई अपेक्षेपेक्षा कमी होती. ज्याचा फटका बसला आणि शेअर्स घसरले. टीसीएस व्यतिरिक्त टेक महिंद्रा, इन्फोसिस, एचसीएल टेक आणि रिलायन्स इंडस्ट्रीज 2.76 टक्क्यांपर्यंत खाली आले.

हेही वाचा: शॉर्ट टर्मसाठीचे कमाल स्टॉक्स, टारगेट आणि स्टॉप लॉस किती ठेवावा?

जागतिक बाजार

इतर आशियाई बाजारपेठांमध्ये हाँगकाँग आणि टोकियोमध्ये वाढ झाली, तर शांघायला तोटा झाला. युरोपच्या प्रमुख बाजारपेठांमध्ये, दुपारच्या व्यवहारात बहुतांश बाजारांमध्ये घसरणीचा कल होता. दरम्यान, आंतरराष्ट्रीय तेल बेंचमार्क ब्रेंट क्रूड 2.12 टक्क्यांनी वाढून 84.14 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचले.

आज कोणत्या शेअर्सवर नजर ठेवाल ?

- टाटा मोटर्स (Tata Motors)

- कोल इंडिया (Coal India)

- मारुती (Maruti)

- पॉवर ग्रिड (Powergrid)

- ग्रासिम (Grasim)

- हिंडाल्को (Hindalco)

- ओएनजीसी (ONGC)

- आयटीसी (ITC)

- एसबीआयएन (SBIN)

- कोटक बँक (Kotak Bank)

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

loading image
go to top