esakal | Sakal - Read Latest Breaking Marathi News from Maharashtra India & Around the World
sakal

बोलून बातमी शोधा

Share Market

आज या 10 शेअर्सवर ठेवा नजर, मालामाल व्हाल

sakal_logo
By
नामदेव कुंभार

मंगळवारी शेअर बाजारात शेवटच्या अर्ध्या तासात कमाल, आज अर्थात बुधवारी कोणत्या शेअर्सवर नजर ठेवाल ?

- शिल्पा गुजर

शेअर बाजारात मंगळवारी दोन वेगळे मूड्स दिसले. दिवसभर कंसोलिडेशन होते, पण शेवटच्या अर्ध्या तासात बाजाराला चांगली गती मिळाली. निफ्टी, बँक निफ्टी आणि सेन्सेक्सने विक्रमी उच्चांकावर बंद झाले. बँका, एफएमसीजी ऑटो आणि फार्मा कंपन्यामध्ये सर्वाधिक खरेदी झाली. सेन्सेक्स 149 अंकांनी वधारून 60,284 वर बंद झाला. निफ्टी 46 अंकांनी वाढून 17,992 वर बंद झाला. निफ्टी बँकेत 228 अंकांची वाढ होत 38,522 वर बंद झाली. मिडकॅप 175 अंकांनी वाढून 31,806 वर बंद झाले. सेन्सेक्समध्ये 30 पैकी 17 शेअर्स तेजीत राहिले. दुसरीकडे निफ्टीच्या 50 पैकी 30 शेअर्समध्ये वाढ झाली. निफ्टी बँकेच्या 12 पैकी 9 शेअर्स मध्ये वाढ झाली.

टाटा मोटर्स, एसबीआय, लॉयड्स स्टील्स इंडस्ट्रीज आणि ज्युबिलंट फूडवर्क्ससह 300 हून अधिक शेअर्सने मंगळवारी 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला. निफ्टीने मंगळवारी दररोजच्या फ्रेमवर लाँग लोअर शॅडोसोबतबुलिश कँडल बनवली, जी प्रत्येक छोट्या घसरणीवर खरेदी होत असल्याचे प्रतिक आहे. निफ्टीला आता 18,100 आणि 18,200 च्या दिशेने जाण्यासाठी 17,950 च्या वर टिकावे लागेल. खाली 17,850 -17,777 वर सपोर्ट मिळच असल्याचे मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेसचे चंदन तापडिया यांनी सांगितले.

आज कोणत्या शेअर्सवर नजर ठेवाल ?

टायटन (TITAN)

बजाज ऑटो (BAJAJ-AUTO)

बजाज फिनसर्व्ह कंपनी (BAJAJFINSV)

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBIN)

डिवीज लेबोरेटोरीज (DIVISLAB)

बाटा इंडिया (BATAINDIA)

कॅनरा बँक (CANBK)

भारत हेवी इलेक्ट्रीकल्स (BHEL)

एसआरएफ लिमिटेड (SRF)

ट्रेंट (TRENT)

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्यप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

loading image
go to top