स्मार्ट संधी : २२ वे वर्षे मोक्याचे! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Smart Opportunity
स्मार्ट संधी : २२ वे वर्षे मोक्याचे!

स्मार्ट संधी : २२ वे वर्षे मोक्याचे!

नवे वर्ष सुरू झाले, की आपण अनेक संकल्प करतो. त्यात जिम लावण्यापासून ते नवे डाएट करण्यापर्यंत बरेच काही आपण ठरवतो. पण आपण आर्थिक संकल्प करतो का? आणि केलाच तर तो खरोखरच अमलात आणतो का?

२०२० मध्ये शेअर बाजार अक्षरशः कोसळला व तिथून पुढे फिनिक्स पक्ष्याप्रमाणे उभारी घेऊन उंचावला. अलीकडे बाजारात बऱ्यापैकी नफेखोरी (प्रॉफिट बुकिंग) दिसून आली. बाजार हा नकारात्मकता पचवू शकतो; परंतु अनिश्चितता नव्हे. २०२२ च्या पहिल्या तिमाहीत असे अनेक मोठे इव्हेंट्स आहेत, ज्याचे बाजारावर थेट परिणाम होऊ शकतात. त्यामुळे वाचकांनी अशा वेळी खरेदी करण्यासाठी आर्थिक तयारी करून ठेवावी; जेणेकरून कोणत्याही पडझडीत खाली आलेल्या भावात आपल्याला चांगले शेअर खरेदी करता येतील.

निवडणुका व बजेट

देशातील पाच राज्यांत होणाऱ्या निवडणुका, त्यातही उत्तर प्रदेश या सर्वांत महत्त्वाच्या राज्यातील निवडणुकीचे निकाल हे बाजारावर प्रभाव टाकू शकतात. तसेच बाजारासाठी वर्षातील सर्वांत प्रभावी दिवस असतो तो केंद्रीय अर्थसंकल्पाचा म्हणजेच बजेटचा! मागील दोन वर्षांत ज्यांना आपण बाजाराच्या तेजीत मागे राहिलो असे वाटत असेल, त्यांना या काळात खरेदीची संधी मिळू शकते.

नक्की काय करावे?

अनेक चांगल्या दर्जाचे लार्जकॅप शेअर, जे खूप मोठ्या तेजीमध्ये आपण घेऊ शकलो नाही, याची यादी बनवून ठेवा. ते जर बाजाराच्या पडझडीत कमी भावात खरेदी करता आले, तर ते अवश्य घ्यावेत. तसेच नव्या कंपन्यांचेही अनेक शेअर, जे आर्थिकदृष्ट्या चांगली कामगिरी करीत आहेत व ते योग्य भावात मिळत असतील, तर त्याचाही खरेदीसाठी विचार करावा. फक्त हे करताना एकदम खरेदी न करता २-४ टप्प्यांत केल्यास लाभदायक ठरेल आणि याचा दीर्घकालीन खरेदीसाठीच विचार करावा. त्यामुळे तज्ज्ञ सल्लागाराच्या मदतीने योग्य नियोजन केल्यास २०२२ हे नवे वर्ष आर्थिकदृष्ट्या मोक्याचे ठरू शकेल.

(लेखकद्वय शेअर बाजारातील गुंतवणुकीचे जाणकार, अभ्यासक-विश्लेषक आहेत.)

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top