esakal | विमा संरक्षणाबरोबरच करमुक्त उत्पन्नाची संधी
sakal

बोलून बातमी शोधा

विमा संरक्षणाबरोबरच करमुक्त उत्पन्नाची संधी

आयुर्विमा क्षेत्रात गुंतवणुकीसाठी अनेक चांगल्या योजना आहेत. जोखीम घेण्याची क्षमता आणि आपली गुंतवणुकीची उद्दिष्टे लक्षात घेऊन युलिप, मनी बॅक, पेन्शन प्लॅन्स यापैकी योजना निवडून गुंतवणूक करता येऊ शकते.

विमा संरक्षणाबरोबरच करमुक्त उत्पन्नाची संधी

sakal_logo
By
शुभांगी राजे

बँकांच्या मुदत ठेवींवरील (एफडी) घसरते व्याजदर, तर दुसरीकडे शेअर बाजारातील अस्थिरता, यामुळे अनेक गुंतवणूकदार पैसे असून देखील गुंतवणूक करण्यापासून चार हात दूर राहणे पसंत करीत आहेत. अशावेळी करमुक्त उपन्न, निश्चित परतावा आणि सोबतच मिळणारे विम्याचे संरक्षण, असा तिहेरी लाभ घेण्यासाठी विम्याच्या विविध योजना नक्कीच फायदेशीर ठरू शकतात.

आयुर्विमा क्षेत्रात गुंतवणुकीसाठी अनेक चांगल्या योजना आहेत. जोखीम घेण्याची क्षमता आणि आपली गुंतवणुकीची उद्दिष्टे लक्षात घेऊन युलिप, मनी बॅक, प्युअर एन्डॉवमेंट, पेन्शन प्लॅन्स यापैकी योजना निवडून गुंतवणूक करता येऊ शकते. किमान पाच वर्षे किंवा योजनेनुसार ७, १०, १५ वर्षे यानुसार दीर्घकाळासाठी नियमित गुंतवणूक करून चांगला एकरकमी किंवा ठरावीक कालावधीमध्ये निश्चित उत्पन्नाचा पर्याय निवडण्याबरोबरच आयुर्विम्याचे संरक्षण देखील मिळविता येते. याशिवाय, निवृत्तीचे नियोजन करण्यासाठी सिंगल प्रीमियम भरून एफडीपेक्षा अधिक निश्चित असा व्याजदर देणाऱ्या योजना देखील बाजारात उपलब्ध आहेत.

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

गुंतवणुकीसाठी उपलब्ध असलेल्या योजनांचे फायदे
निश्चित उत्पन्न : ठरावीक कालावधीसाठी प्रीमियम भरून किंवा गुंतवणूक करून संपूर्ण आयुष्यभर उत्पन्न मिळविण्याचा स्रोत.

गुंतवणूक करण्यासाठीचे विविध कालावधी : आपल्या आर्थिक उद्दिष्टानुसार (जसे की मुलांचे शिक्षण, लग्न) गुंतवणूक कालावधी निश्चित करून उत्पन्नाची हमी.- इमिजिएट किंवा डेफर्ड इन्कम ः तुमच्या गरजेनुसार इमिजिएट किंवा डेफर्ड इन्कमअंतर्गत योजना घेतल्याच्या अगदी पुढच्या महिन्यापासून किंवा जास्त उत्पन्न हवे असेल तर ठरावीक कालावधीनंतर उत्पन्न मिळविता येऊ शकेल.

मॅच्युरिटी बेनिफिट ः पॉलिसीच्या शेवटी मॅच्युरिटी बेनिफिटअंतर्गत संपूर्ण गुंतवणूक रक्कम परत मिळते.

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

आयुर्विमा : तुम्ही भरत असलेल्या वार्षिक प्रीमियमच्या किमान दहापट रकमेचा आयुर्विमा गुंतवणूकदाराला मिळतो. पॉलिसीअंतर्गत मिळणारा आयुर्विमा घेताना तो मर्यादित किंवा संपूर्ण आयुष्यभरासाठी (१०० वर्षांपर्यंत) घेता येतो.

प्रीमियम वेव्हर रायडर : विमा घेणाऱ्याचा दुर्दैवाने अपघाती मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास प्रीमियम भरण्यापासून सूट मिळण्याबरोबरच पॉलिसीअंतर्गत मिळणारे फायदे कायम राहतात.

कोविड-१९ सारख्या आपत्तींपासून संरक्षण : कोविड-१९ किंवा कोविडसारख्या इतर आपत्तींपासून गुंतवणूकदाराचा मृत्यू झाल्यास पॉलिसीअंतर्गत मिळणारे फायदे कायम राहतात.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

करमुक्त उत्पन्न ः प्राप्तिकर कायदा १९६१, कलम १० (१० डी)अंतर्गत व्यक्तीच्या मृत्यूपश्चात नॉमिनीस मिळणारी पॉलिसीची रक्कम अथवा विम्याच्या कालावधीची पूर्तता झाल्यावर मिळणारी रक्कम व बोनस संपूर्णपणे करमुक्त आहे.

तीन पिढ्यांपर्यंत हमखास उत्पन्न
आपण केलेल्या गुंतवणुकीचा आपल्या तिसऱ्या पिढीपर्यंत निश्चित स्वरूपात लाभ मिळेल, अशा काही ‘थ्री जनरेशन’ योजना देखील बाजारात लोकप्रिय आहेत. उदा. ः आपल्या मुलाला निश्चित स्वरूपात उत्पन्न मिळावे म्हणून वडिलांनी दहा वर्षांसाठी प्रतिवर्ष एक लाख रुपये याप्रमाणे प्रीमियम भरल्यास मुलगा जिवंत असेपर्यंत (१०० वर्षांपर्यंत) १ ते १.२५ लाख रुपयांचे निश्चित उत्पन्न मिळत राहते. याशिवाय, पॉलिसीचा प्रीमियम भरण्याच्या काळात वडिलांचा मृत्यू झाल्यास १० लाख रुपयांचा आयुर्विमा किंवा प्रीमियम वेव्हर मिळू शकेल. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे मुलाच्या मृत्यूनंतर त्याच्या नॉमिनीला प्रीमियम म्हणून भरलेली १० लाख रुपयांची मूळ रक्कम आणि त्यावरील लाभ, अशा प्रकारे ‘थ्री जनरेशन’ परतावा मिळतो.

loading image