esakal | चांदीची चमक वाढली; भाव 50 हजारांवर
sakal

बोलून बातमी शोधा

चांदीची चमक वाढली; भाव 50 हजारांवर

दिल्लीतील सराफा बाजारात आज चांदीचा भाव प्रतिकिलोमागे 2 हजार 70 रुपयांनी वाढून 50 हजार 125 रुपयांवर गेला. औद्योगिक क्षेत्र आणि नाणेनिर्मिती करणाऱ्यांकडून वाढलेली मागणीही चांदीचे भाव वाढण्यास कारणीभूत ठरली.

चांदीची चमक वाढली; भाव 50 हजारांवर

sakal_logo
By
पीटीआय

नवी दिल्ली : सोने आणि चांदीच्या भावातील तेजीचे वारे सलग दुसऱ्या दिवशी बुधवारी कायम राहिले. जागतिक बाजारपेठेत भाव वधारल्यामुळे देशांतर्गत बाजारात चांदीने आज उसळी घेतली. 

दिल्लीतील सराफा बाजारात आज चांदीचा भाव प्रतिकिलोमागे 2 हजार 70 रुपयांनी वाढून 50 हजार 125 रुपयांवर गेला. औद्योगिक क्षेत्र आणि नाणेनिर्मिती करणाऱ्यांकडून वाढलेली मागणीही चांदीचे भाव वाढण्यास कारणीभूत ठरली. शुद्ध सोन्याचा भाव आज प्रतिदहा ग्रॅमला 122 रुपयांची वाढ होऊन 39 हजार 248 रुपयांवर गेला.

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत आज सोन्याचा भावात घसरण झाली. तो प्रतिऔंस 1 हजार 537 डॉलरवर आला. याचवेळी चांदीचा भाव आज वधारून प्रतिऔंस 19.27 डॉलरवर गेला. 

मुंबईतही भाव वधारले 
मुंबईतील सराफा बाजारात आज चांदीचा भाव प्रतिकिलोला 1 हजार 895 रुपयांची वाढ होऊन 49 हजार 950 रुपयांवर गेला. शुद्ध सोन्याचा भाव प्रतिदहा ग्रॅमला 62 रुपयांनी वधारून 39 हजार 188 रुपयांवर गेला. याचवेळी स्टॅंडर्ड सोन्याचा भावही तेवढीच वाढ होऊन 39 हजार 31 रुपयांवर गेला. 

loading image
go to top