esakal | Budget 2020 : निर्मला सीतारामन लाल चोपडी घेऊन परतल्या; ब्रिफकेस का नाही?

बोलून बातमी शोधा

Sitharaman back with traditional bahi khata for Budget 2020

पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारचा अर्थसंकल्प आज (ता. 1) सादर होत आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून हा अर्थसंकल्प सादर केला जाईल. मागील वर्षीपर्यंत अर्थसंकल्प ब्रिफकेसमधून संसदेत आणण्याची परंपरा होती.

Budget 2020 : निर्मला सीतारामन लाल चोपडी घेऊन परतल्या; ब्रिफकेस का नाही?
sakal_logo
By
वृत्तसंस्था

अर्थसंकल्प 2020 : नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारचा अर्थसंकल्प आज (ता. 1) सादर होत आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून हा अर्थसंकल्प सादर केला जाईल. मागील वर्षीपर्यंत अर्थसंकल्प ब्रिफकेसमधून संसदेत आणण्याची परंपरा होती. मात्र, मागील वर्षीपासून सीतारामन यांनी ही परंपरा मोडीत काढत लाल रंगाच्या चोपडीतून अर्थसंकल्प आणण्यास सुरवात केली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

2019 मधला अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी सीतारामन यांच्या हातात लाल कापडात गुंडाळून आणलेला अर्थसंकल्प बघून मोठ्या प्रमाणत चर्चा झाली होती. यावेळी त्यांच्याकडे 'ब्रिफकेस' नसल्याने अनेकांना आश्चर्य वाटले होते. यावर्षीही सकाळी सकाळी सीतारामन व केंद्रीय अर्थराज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी लाल चोपडी घेऊनच राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली.

Budget 2020:स्वातंत्र्यानंतरचं पहिलं बजेट कोणी सादर केलं?

अर्थसंकल्प ब्रिफकेसमधून न आणता लाल चोपडीतून आणावा यामागे कारण आहे. मुख्य आर्थिक सल्लागार कृष्णमूर्ती सुब्रमण्यन यांनी सांगितले, की अर्थसंकल्पाला आपण चोपड्या म्हणतो. चोपड्या लाल रंगाच्या कपड्यात असतात. ती आपली परंपरा आहे, त्यामुळे आता दरवर्षी अर्थसंकल्प हा लाल चोपडीतून आणला जाईल. या लाल चोपडीला हिंदीमध्ये भाई-खाता (ledger) असे म्हणतात.