ATM मधून पैसे काढताय? पण आता...

वृत्तसंस्था
मंगळवार, 27 ऑगस्ट 2019

- देशात वर्षभरात झाले 980 गैरव्यवहार.

- 233 गैरव्यवहार हे महाराष्ट्रात

- 179 गैरव्यवहार दिल्लीत. 

मुंबई : देशभरात सध्या एटीएमचा वापर दिवसेंदिवस वाढत आहे. तसेच एटीएम गैरव्यवहारांचे प्रमाणही अधिक आहे. एटीएमच्या माध्यमातून होणाऱ्या गैरव्यवहाराला आळा घालण्यासाठी आता पावले उचलली जात आहेत. त्याच पार्श्वभूमीवर यापुढे एटीएममधून दिवसाला दोनदाच पैसे काढण्याबाबत विचार सुरु आहे.

देशात वर्षभरात 980 गैरव्यवहार झाल्याचे समोर आले आहे. यामध्ये 233 गैरव्यवहार हे महाराष्ट्रात तर 179 गैरव्यवहार हे दिल्लीत झाले आहेत. या एटीएम गैरव्यवहाराच्या पार्श्वभूमीवर 'दिल्ली स्टेट लेव्हल बँकर्स कमिटी'ने एटीएममधून दिवसाला दोनदाच पैसे काढण्याबाबत शिफारस केली आहे. या कमिटीच्या शिफासशीनुसार एटीएमच्या दोन व्यवहारांदरम्यान 6 ते 12 तासांचे अंतर ठेवावे लागणार आहे.

दरम्यान, या शिफारशीवर देशातील 18 बँकांच्या प्रतिनिधींनी चर्चा केली आणि यावर सकारात्मक प्रतिक्रियाही दिली जात आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Some Changes may happens when Withdraw of Cash from ATM