सार्वभौम सुवर्ण रोख्यांविषयी…

डॉ. दिलीप सातभाई  (चार्टर्ड अकाउंटंट)
सोमवार, 27 फेब्रुवारी 2017

रिझर्व्ह बॅंकेने केंद्र सरकारच्या वतीने सार्वभौम सुवर्ण रोख्यांच्या विक्रीचा सातवा टप्पा विक्रीस खुला करण्याचा निर्णय घेतला आहे. या सुवर्ण रोख्यांच्या अर्जांची विक्री 27 फेब्रुवारीपासून सुरू होणार असून तीन मार्चला बंद होणार आहे. सर्व अर्जदारांना 17 मार्च रोजी सुवर्ण रोख्यांचे वाटप केले जाणार आहे. केंद्र सरकारची हमी असणारे हे सुवर्ण रोखे वजनावर आधारित असून, किमान एक ग्रॅम व कमाल पाचशे ग्रॅम वजनाचे सुवर्ण रोखे एका आर्थिक वर्षात मिळू शकतील. प्रत्येक ग्रॅम सोन्याची किंमत बाजारभावापेक्षा 50 रुपयांनी कमी असून, ती 2893 रुपये निश्‍चित करण्यात आली आहे.

रिझर्व्ह बॅंकेने केंद्र सरकारच्या वतीने सार्वभौम सुवर्ण रोख्यांच्या विक्रीचा सातवा टप्पा विक्रीस खुला करण्याचा निर्णय घेतला आहे. या सुवर्ण रोख्यांच्या अर्जांची विक्री 27 फेब्रुवारीपासून सुरू होणार असून तीन मार्चला बंद होणार आहे. सर्व अर्जदारांना 17 मार्च रोजी सुवर्ण रोख्यांचे वाटप केले जाणार आहे. केंद्र सरकारची हमी असणारे हे सुवर्ण रोखे वजनावर आधारित असून, किमान एक ग्रॅम व कमाल पाचशे ग्रॅम वजनाचे सुवर्ण रोखे एका आर्थिक वर्षात मिळू शकतील. प्रत्येक ग्रॅम सोन्याची किंमत बाजारभावापेक्षा 50 रुपयांनी कमी असून, ती 2893 रुपये निश्‍चित करण्यात आली आहे. कोणत्याही राष्ट्रीयीकृत बॅंकेत, स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, काही निवडक टपाल कार्यालयांत या सुवर्ण रोखे खरेदीचे अर्ज मिळू शकतील. सुवर्ण रोख्यांच्या विक्रीचा या आर्थिक वर्षातील हा शेवटचा टप्पा आहे.

सरकारने नागरिकांना प्रत्यक्ष सोने विकत घेण्याऐवजी सुवर्ण रोख्यांत गुंतवणूक करण्यासाठी ही योजना नोव्हेंबर 2015 पासून सुरू केली. यामुळे प्रत्यक्ष सोने खरेदी न करता त्यात गुंतवणुकीची संधी नागरिकांना मिळाली. सरकारने या योजनेतून 3060 कोटी रुपयांचा निधी आतापर्यंत उभारला आहे. गेल्या वर्षात या योजनेमुळे सोन्याच्या आयातीत दहा टक्के घट झाली आहे, हे या योजनेचे यश मानायला हवे. आतापर्यंत विक्रीस काढण्यात आलेल्या सुवर्ण रोख्यांचा लेखाजोखा सोबतच्या चौकटीत दिला आहे. त्यावरून ही योजना कशी हळूहळू यशस्वी होत आहे, याची कल्पना येऊ शकेल.

हे सुवर्ण रोखे आठ वर्षे मुदतीचे आहेत. प्राप्तिकर कायद्यानुसार विक्री केलेल्या सुवर्ण रोख्यांचा भांडवली नफा मुदतपूर्तीपश्‍चात करमुक्त करण्यात आला आहे. योग्य बाजारमूल्याचा फायदा घेण्यासाठी रोखीकरण करण्याचा पर्याय पाचव्या, सहाव्या, सातव्या वर्षानंतर उपलब्ध आहे. या रोख्यांची शेअर बाजारात नोंदणी होणार असल्याने गरजू लोकांना मुदतपूर्व रोखीकरण करणे शक्‍य होऊ शकेल. तीन वर्षांवरील रोख्यांवर होणाऱ्या भांडवली नफ्यासाठी खरेदीमूल्य हे भाववाढ निर्देशांकाशी निगडित करण्याची सवलत देण्यात आली आहे. या रोख्यांवर दरवर्षी अडीच टक्के दराने सहामाही (करपात्र) व्याज देण्याची तजवीज आहे. वीस हजार रुपयांपर्यंतची खरेदी रोख पैसे देऊनही करता येणार आहे. तात्पुरत्या आर्थिक टंचाईवर मात करण्यासाठी हे सुवर्ण रोखे घेतलेल्या कर्जासाठी तारण म्हणून ठेवता येऊ शकतील. भविष्यात विविध कारणांस्तव कराव्या लागणाऱ्या सोन्याच्या खरेदीसाठी नियोजनपूर्वक आखणी या रोख्यांद्वारे करता येऊ शकेल, इतके हे मौल्यवान रोखे आहेत.

Web Title: Sovereign Gold Bonds opens on Feb 27