esakal | ‘स्पाईस जेट’चा सेवाविस्तार
sakal

बोलून बातमी शोधा

SpiceJet

‘स्पाईस जेट’ येत्या २६ एप्रिलपासून आपली सेवा विस्तारणार असून, त्याअंतर्गत मुंबई, दिल्ली व इतर काही मार्गांवर २८ दैनंदिन उड्डाणे सुरू करण्यात येणार असल्याची माहिती कंपनीने मंगळवारी दिली.

‘स्पाईस जेट’चा सेवाविस्तार

sakal_logo
By
पीटीआय

नवी दिल्ली - ‘स्पाईस जेट’ येत्या २६ एप्रिलपासून आपली सेवा विस्तारणार असून, त्याअंतर्गत मुंबई, दिल्ली व इतर काही मार्गांवर २८ दैनंदिन उड्डाणे सुरू करण्यात येणार असल्याची माहिती कंपनीने मंगळवारी दिली. 

कर्ज संकटात अडकलेल्या ‘जेट एअरवेज’ने आपली सेवा पूर्णतः बंद केल्यामुळे निर्माण झालेल्या संधीचा फायदा घेण्यासाठी या क्षेत्रातील इतर कंपन्या सरसावल्या असून, यापैकी एक असलेली ‘स्पाईस जेट’ही आपली सेवा मोठ्या प्रमाणात विस्तारत आहे. कंपनी मुंबईहून जयपूर, अमृतसर, मंगळूर, कोइम्बतूर तसेच दिल्लीहून पाटणा, बेंगळूर, मुंबई या मार्गांवर नवीन सेवा सुरू करणार आहे. मुंबईहून पाटणा, हैदराबाद, दिल्ली आणि कोलकाता या मार्गांवरील फेऱ्यांमध्येही वाढ केल्याचे कंपनीने स्पष्ट केले.  दरम्यान, कंपनीने मुंबई ते हाँगकाँग, जेदाह, दुबई, कोलंबो, रियाध, बॅंकॉक या मार्गावर मे महिन्याच्या अखेरीस सेवा सुरू करण्याची घोषणा यापूर्वी केली आहे.

loading image