नफावसुलीने शेअर निर्देशांक गडगडला

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 21 नोव्हेंबर 2018

मुंबई - सलग तीन सत्रात वधारलेल्या शेअर्समध्ये गुंतवणूकदारांनी नफेखोरी केल्याने सेन्सेक्‍स आणि निफ्टीला झळ बसली. मंगळवारी (ता.२०) मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्‍स ३००.३७ अंशांच्या घसरणीसह ३५ हजार ४७४ वर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी १०७.२ अंशांच्या घसरणीसह १० हजार ६५६ अंशांवर बंद झाला. 

अमेरिकन अर्थव्यवस्थेचा खुंटलेला विकास आणि फेडरल रिझर्व्हच्या पतधोरणाकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे. त्यापार्श्‍वभूमीवर आज जगभरातील प्रमुख बाजारांमध्ये विक्रीचा ट्रेंड दिसून आला. मेटल, टेक, हेल्थकेअर आदी क्षेत्रात गुंतवणूकदारांनी विक्रीचा सपाटा लावला. सोमवारच्या सत्रात वधारलेल्या येस बॅंकेच्या शेअरमध्ये आज ६ टक्‍क्‍यांची घट झाली. टाटा स्टील, वेदांता, एनटीपीसी, भारती एअरटेल, एसबीआय, एचडीएफसी, आयसीआयसीआय बॅंक, मारुती सुझुकी आदी शेअर घसरणीसह बंद झाले. 

रुपया सुसाट !
चलन बाजारात डॉलरच्या तुलनेत सलग सहाव्या सत्रात रुपयाने दमदार कामगिरी केली. दिवसअखेर रुपया २१ पैशांनी वधारून ७१.४६ वर बंद झाला. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The stock index collapsed by profitability