share market
share marketgoogle

शेअर बाजारात तेजी; सेन्सेक्स ९३४ अंकांनी आणि निफ्टी २८८ अंकांनी वधारला

चांगल्या जागतिक संकेतांमुळे देशांतर्गत बाजारात तेजी दिसून आल्याचे जिओजित फायनान्शिअल सर्व्हिसेसचे विनोद नायर म्हणाले.

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून चाललेली शेअर बाजारातील घसरण थांबून सोमवारी येथे तेजी दिसून आली. मंगळवारीही हीच स्थिती कायम राहिली. मंगळवारी शेअर बाजार बंद होताना सेन्सेक्स ५२,५३२.०७ अंकांवर तर निफ्टी १५,६३८.८० अंकांवर स्थिरावला. दोन्हींमध्ये अनुक्रमे ९३४.२३ (१.८१ टक्के) आणि २८८.६५ (१.८८ टक्के) अंकांची वाढ दिसून आली. त्यामुळे शेअर बाजार हिरव्या रंगात बंद झाला.

share market
शेअर मार्केट : आता संधी ओळखून गुंतवणूक

चांगल्या जागतिक संकेतांमुळे देशांतर्गत बाजारात तेजी दिसून आल्याचे जिओजित फायनान्शिअल सर्व्हिसेसचे विनोद नायर म्हणाले. लार्ज कॅप शेअर्सने बाजाराला सपोर्ट मिळाला. दुसरीकडे, लघु-मध्यम शेअर्सवर दबाव होता. चलनवाढीचा दबाव आणि आर्थिक धोरणे कडक करण्याच्या शक्यतांमुळे बाजारावर दबाव राहिला.

share market
शेअर मार्केट : कर न चुकवता श्रीमंत व्हायचंय?

सोमवारी शेअर बाजारात सलगच्या घसरणीला ब्रेक लागला होता आणि आठवड्याच्या पहिल्याच दिवशी तेजी दिसून आली होती. आजही सुरवातीच्या सत्रात शेअर बाजार हिरव्या रंगात उघडला. आज सेन्सेक्स ३३८ अंकाच्या तेजीसह ५१,९३६ वर सुरू झाला तर निफ्टी १०६ अंकाच्या तेजीसह १५,४५६ वर सुरू झाला. सलग दोन दिवस शेअर बाजार तेजीत असल्याने या आठवड्यात शेअर बाजाराची स्थिती उत्तम राहण्याची शक्यता आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com